Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 08:40 AM2018-11-24T08:40:33+5:302018-11-24T10:01:56+5:30

कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात भीषण अपघात झाला आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Five people died on the spot in car accident in Kolhapur | Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देटायर फुटून कारचा डोहात कोसळली5 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमीमृतांमध्ये 4 महिलांचा समावेश

कोल्हापूर - कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात भीषण अपघात झाला आहे. पन्हाळा रोडवर देव दर्शनाहून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जणांचा प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलींचा समावेश आहे. हे सर्व जण मालगाव रोड मिरज येथील दत्त कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तवेरा (MH15 EB4340) कारमधून तांदळे कुटुंबीय  गणपतीपुळे येथून देवदर्शन घेऊन घराकडे परतत होतं. यादरम्यान, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या रेडे डोहात बुडाली. हा अपघात शुक्रवारी उशिरा रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झाला.

तांदळे कुटुंब कोल्हापूर-पन्हाळा रोडवरुन तवेरा कारने प्रवास करत होते. याचदरम्यान, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भीषण दुर्घटना घडली.  

 

मृतांची नावे
1. अश्विनी सुनील तांदळे (वय 26 वर्ष) 

2. अनिषा सुनील तांदळे (वय 14 वर्ष)

3. धनश्री शशिकांत माने (वय 7 वर्ष)

4. जान्हवी सुनील तांदळे (वय 7 वर्ष)

5. बेबी सुनील तांदळे ( वय 3वर्ष )

जखमींची नावे
1. आदर्श नितीन तांदळे ( वय 5 वर्ष)
2. ओम सुनील तांदळे (वय 3 वर्ष)
जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Five people died on the spot in car accident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.