Fire extinguish a farmer's death | आग विझवताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू
आग विझवताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

ठळक मुद्देती आग विझविण्यासाठी कोळी यांनी धाडसाने प्रयत्न केला, पण चारी बाजंूनी आगीच्या विळख्यात ते अडकले.

खोची : हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील शेतकरी शिवाजी विष्णू कोळी (वय ४९) यांच्या उसाच्या फडाला लागलेली आग विझविताना होरपळून मृत्यू झाला. चारी बाजूंनी आगीने वेढा दिल्यामुळे त्यात अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यात भाजून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लाटवडे येथील मळी भागाच्या शेतात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजी कोळी हे आपल्या शेताकडे गेले होते. त्यांनी आपल्या शेतातील उसाचा पाला पेटविला. उन्हाचा तडाखा होता. त्यामुळे आगीने झपाट्याने पेट घेतला. वाºयाचा वेग असल्याने आगीची ठिणगी शेजारील शेतात पडली. तेथील उभ्या उसालाही आग लागली. ती आग विझविण्यासाठी कोळी यांनी धाडसाने प्रयत्न केला, पण चारी बाजंूनी आगीच्या विळख्यात ते अडकले. यात ते पूर्णपणे भाजले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाचे विच्छेदन पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात केले. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
 


Web Title: Fire extinguish a farmer's death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.