लढा ! आत्महत्या नको नेत्यांची भावनिक साद : विनायक गुदगी याला शोकसभेत श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:56 AM2018-08-07T00:56:57+5:302018-08-07T00:58:05+5:30

मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली.

Fight! Emotional Sadat's Negotiations for Doing Suicide: Tribute to Shankar in Vinayak Gudagi | लढा ! आत्महत्या नको नेत्यांची भावनिक साद : विनायक गुदगी याला शोकसभेत श्रद्धांजली

लढा ! आत्महत्या नको नेत्यांची भावनिक साद : विनायक गुदगी याला शोकसभेत श्रद्धांजली

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली. विनायक गुदगी या कणेरीवाडीतील तरुणाने रविवारी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दसरा चौकात शोकसभेचे आयोजन केले होते.
आरक्षण हा आपला हक्क असला तरीही तो आपण मिळवणारच आहे, पण त्यासाठी आत्महत्या करू नका. लढा द्या, यश जवळ आले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी बळ हवे आहे, त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद अनेक आंदोलक प्रमुखांनी घातली. शासनानेही आंदोलकांचा अंत पाहू नये. तातडीने आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा शासनाविरोधी ‘हर हर महादेव’ची घोषणा द्यायलाही वेळ लागणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, सचिन तोडकर, प्रा. जयंत पाटील, हर्षल सुर्वे यांची शोकसभेत भाषणे झाली.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या विनायक गुदगी याने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गुदगी याच्या भावाला एका कंपनीत नोकरीस घेण्याची जबाबदारी एका उद्योजकाने उचलली आहे.

मराठा आरक्षण चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न : महेश जाधव
कोल्हापूर : स्वत:च्या मतदारसंघातील मराठा आरक्षण आंदोलन ज्यांनी बाजूला ठेवले आहे, असे काहीजण कोल्हापुरात येऊन भाषणबाजी करत आहेत. काही मंडळी मुद्दामहून हे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे कोल्हापूर महानगरचे माजी अध्यक्ष व पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकाद्वारे केला. त्याचबरोबर विनायक गुदगी याची आत्महत्या मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकातील माहिती अशी : गेले दहा-बारा दिवस मराठा आरक्षणाबाबत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बाहेरून येऊन येथे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. हे योग्य नसून कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरअखेर मराठा समाजाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून आरक्षण देणार, असे सांगितले आहे; त्यामुळे आंदोलकांनी त्यावर विश्वास ठेवावा व शांततेने व संयमाने आंदोलन करावे. जर ( पान ४ वर)

Web Title: Fight! Emotional Sadat's Negotiations for Doing Suicide: Tribute to Shankar in Vinayak Gudagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.