हुपरीत सौभाग्यवतींसाठी पतीराजांकडून ‘फिल्डिंग’_ नगरपालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:38 PM2017-11-08T23:38:25+5:302017-11-08T23:42:34+5:30

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील नवनिर्मित नगरपालिकेचा लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी

 'Fielding' municipality election from Patrajaj for municipal elections | हुपरीत सौभाग्यवतींसाठी पतीराजांकडून ‘फिल्डिंग’_ नगरपालिका निवडणूक

हुपरीत सौभाग्यवतींसाठी पतीराजांकडून ‘फिल्डिंग’_ नगरपालिका निवडणूक

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना नेत्यांच्या सावध हालचालीशहरांतील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांची शहरातील ताकद जवळजवळ समान

तानाजी घोरपडे ।
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील नवनिर्मित नगरपालिकेचा लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी आरक्षणाने महिलांना दिल्याने काहीअंशी नाराज झालेल्या स्थानिक नेत्यांनी महिला उमेदवार निवडताना अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. ‘मी नाही तर माझी सौभाग्यवती’ असा पवित्रा घेत ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीप्रमाणे या नेत्यांनी आतापासूनच आपल्या सौभाग्यवतीच्या नावाची निवडणुकीच्या सारिपाटावर व्यवस्थित साखर पेरणी सुरू केली आहे.

परिणामी, हा मुस्कटदाबीचा प्रकार सहन होत नसलेल्या सर्वच पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी एखाद्या धनदांडग्याच्या किंवा नेत्याच्या घरात उमेदवारी न देता सर्वसामान्य महिलेलाच उमेदवारी द्यावी, असा हट्ट धरला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या रौप्यनगरी शहरातील राजकीय वातावरण ‘ठंडा ..ठंडा ..कुल ..कुल’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही सर्वच पक्षांमध्ये गटांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.

रौप्यनगरीवासीयांनी अत्यंत शांततेने उभारलेल्या लोकलढ्याच्या माध्यमांतून सात महिन्यांपूर्वी उदयास आलेल्या नगरपालिकेची पहिलीच निवडणूक पुढील महिन्यात (डिसेंबर) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरांतील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली असून, लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष व पहिला नगरसेवक म्हणून मिरविण्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (माजी मंत्री, आवाडे गट), भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांची शहरातील ताकद जवळजवळ समान आहे. त्यामुळे युती, आघाडी करून लढल्याशिवाय एकाही पक्षाला यश मिळणे अशक्य असल्याने सर्वच पक्ष राजकीय गोळाबेरीज करण्याच्या कामाला लागले आहेत.

नगरपालिका स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच प्रथम नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पहाणाºयांना गेले दोन महिने आरक्षण सोडतीने अक्षरश: झुलवत ठेवले होते. २ नोव्हेंबरला मंत्रालयात निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षण सोडतीने प्रथम नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहणाºया अनेक स्थानिक नेत्यांना जोरदार धक्का बसला असून, त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. नगराध्यक्षपदाच्या मृगजळामागे आपण उगाचच धावत होतो, याची जाणीव झाल्याने व सत्य, वास्तव समोर आल्याने नेतेमंडळी आता भानावर आली असून, राजकीय जोडण्या करण्याच्या कामास लागली आहेत.

पहिलीच निवडणूक चुरशीची होणार

१ होऊ घातलेली नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीने व अटीतटीने होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष मनी व मसल पॉवर असणाºया मातब्बर उमेदवारांच्या शोधात आहेत. या नियमांमध्ये केवळ स्थानिक नेते किंवा एखादे धनदांडगे घराणेच बसू शकते, याची जाणीव सर्वसामान्य कार्यकर्त्याला झाल्याशिवाय राहिली नाही.

२ प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी हुकलेले स्थानिक नेते ‘मी नाही तर माझी सौभाग्यवती’ असे म्हणत आपल्याच घरात नगराध्यक्षपद ठेवण्यासाठी आपल्या सौभाग्यवतीच्या नावाची निवडणुकीच्या सारिपाटावरती विविध मागार्ने साखर पेरणी सुरू केली आहे. हा प्रकार सर्वच पक्षांतील सर्वसामान्य व स्वाभिमानी कार्यकर्त्याला रुचत नसल्याने सध्या तो अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title:  'Fielding' municipality election from Patrajaj for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.