राज्य नाट्यमधील सर्वोत्कृष्ट नाटकांचा बुधवारपासून महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:48 PM2019-07-13T16:48:26+5:302019-07-13T16:50:41+5:30

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५८ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २४)पासून चार दिवस केशवराव भोसले नाट्यगृहात हा महोत्सव होईल. तसेच रविवारी (दि.२१) राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Festival of the Best Plays of State drama from Wednesday | राज्य नाट्यमधील सर्वोत्कृष्ट नाटकांचा बुधवारपासून महोत्सव

राज्य नाट्यमधील सर्वोत्कृष्ट नाटकांचा बुधवारपासून महोत्सव

Next
ठळक मुद्देराज्य नाट्यमधील सर्वोत्कृष्ट नाटकांचा बुधवारपासून महोत्सव पारितोषिक वितरण रविवारी

कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५८ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २४)पासून चार दिवस केशवराव भोसले नाट्यगृहात हा महोत्सव होईल. तसेच रविवारी (दि.२१) राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी साडेदहा वाजता राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. यात मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

महोत्सवातील नाटके 

  1. बुधवार (दि. १७) : सायंकाळी सात वाजता : अव्याहत (हंस संगीत नाट्य मंडळ, फोंडा)
  2. गुरूवार (दि. १८) : सायंकाळी सात वाजता : सवेरेवाली गाडी (हिंदी नाटक, कलाकृती, मुंबई)
  3. शुक्रवार (दि. १९) : सायंकाळी सात वाजता : संगीत संत गोरा कुंभार (संगीत नाटक, राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी)
  4. शनिवार (दि. २०) : सकाळी अकरा वाजता : काऊ माऊ बालनाट्य (परिवर्तन प्रतिष्ठान, बीड)
  5. दुपारी दोन वाजता : वज्रवृक्ष संस्कृत नाटक( इंद्रधनू कलाविष्कार, सांगली)
  6. सायंकाळी सात वाजता : व्यावसायिक नाटक सोयरे सकळ (भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई)

 

 

Web Title: Festival of the Best Plays of State drama from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.