कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 06:15 PM2017-10-30T18:15:10+5:302017-10-30T18:24:50+5:30

Fasting at the door of the police chief if the factories are not protected: Mushrif | कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

Next
ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांचा सरकारला इशारा कायदा असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नाहीआणखी चार कारखाने रडारवर!

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.


संघटनांमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. हे मान्य करीत मुश्रीफ म्हणाले, ऊस दरासाठी सरकारने एफआरपी आणि उत्पन्नावर आधारित ७० : ३० व ७५ : २५ फॉम्युल्यानुसार अंतिम दर देणे बंधनकारक केले आहे. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांकडून भागभांडवल गोळा करून कारखाने उभे करायचे आणि दर मात्र हे ठरविणार, हे आता चालणार नाही.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कागल परिसरातून ५० हजार टन तर चंदगड, आजरा परिसरांतून ३० हजार टन ऊस गेला आहे. आम्ही कारखाने कसे चालवायचे? तो ऊस संघटनेने का अडविला नाही.

कायद्याने दर देणे बंधनकारक असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड केली. यावर्षी एफआरपीमध्ये ३00 रुपयांची वाढ झाल्याने बॅँकांची उचल व एफआरपी देतानाच अनेकांची दमछाक होणार आहे. काही कारखानदार त्यांच्याशी सामील होऊन दर जाहीर करीत असेल तर जरूर करू देत, असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी चार कारखाने रडारवर!

जिल्हा बॅँकेने नियम सोडून कर्ज दिल्याने चार कारखाने सुरू झाले. गत हंगामात जानेवारीत धुराडी बंद पडली. कामगारांना दहा महिने बसून पगार द्यावा लागला. ‘सब घोडे बारा टक्के’ यामुळे ‘पंचगंगा’, ‘गायकवाड’, ‘दौलत’, ‘इंदिरा’ हे कारखाने दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. ‘दत्त-आसुर्ले’ विक्रीस निघाला. आणखी चार ते पाच कारखाने रडारवर आहेत. कारखाने वाचले तर शेतकºयांना चांगले पैसे देता येतील, याचे भान संघटनेने ठेवावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शेट्टी सांगतील तोच कायदा करा

कायद्यापेक्षा कोणी स्वत:ला श्रेष्ठ समजत असतील तर ते आता खपवून घेणार नाही. कारखान्यांना संरक्षण द्यायला जमत नसेल तर कायदे मोडून राजू शेट्टी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत सांगतील तोच दर, असे एकदा सरकारने आम्हाला सांगावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

काळे-पांढरे बोके कोठे गेले?

मध्यंतरी दूध दराच्या आंदोलनात ‘गोकुळ’ला टार्गेट करून ‘पांढºया दुधातील काळे बोके’ अशी टीका केली. स्वत:चा ‘स्वाभिमानी’ दूध संघ काढला; पण इतरांपेक्षा किती जादा दर दिला? कोठे गेले ‘काळे-पांढरे बोके? असा सवाल करीत शेट्टी यांनी एखादा कारखाना चालविण्यास घेऊन दर द्यावा म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘आजरा’ ला परमेश्वरच वाचवू शकतो

गत हंगामात आजरा कारखान्याकडे जिल्हा बॅँकेसह इतर बॅँकांची ३१ कोटी ३४ लाखांची कर्जे आहेत. यातील एक रुपयाची परतफेड झालेली नाही. वाढीव एफआरपी पाहता साखरेच्या दरात थोडी जरी घसरण झाली तरी ‘आजरा’ कारखान्याला परमेश्वरच वाचवू शकेल, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी ताळेबंद मांडल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
 

 

Web Title: Fasting at the door of the police chief if the factories are not protected: Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.