The existence of the South Door in the Pawangand Cleanliness campaign | पावनगड स्वच्छता मोहिमेतून दक्षिण दरवाज्याचे अस्तित्व उजेडात
 पावनगडाच्या बुुरुजाच्या दक्षिण दरवाज्याचे पुरातन चित्र.

ठळक मुद्देश्री शिवाजी मºहाठा फौंडेशनची मोहीम : डागडुजीची मागणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडनजीकच्या मार्कंडेय पर्वतावर नवीन उभारलेला दुर्ग म्हणजे पावनगड. काळाच्या ओघात गडावरील दोनपैकी हणमंत दरवाजा नामशेष झाला असून, दुसऱ्या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही ३५० वर्षांनंतरही टिकून आहेत. या दरवाज्याच्या अवशेषाची स्वच्छता मोहीम श्री शिवाजी मºहाठा फौंडेशनच्यावतीने राबविली. यामुळे दक्षिण दरवाज्याचे सध्याचे अस्तित्वातील अवशेष उजेडात आले.

पावनगड हा शिवाजी महाराज यांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जद यांच्या कल्पकतेतून उभारला. गडाच्या दोनपैकी हणंमत दरवाजा नामशेष झाला, तर कोल्हापुरातील मोडी संशोधक अमित आडसुळे यांनी गडाबद्दलच्या दरवाज्यांची नावे, तुपाची विहीर, गडावरील मंदिरे, राजवाडा यांच्या माहितीची कागदपत्रे प्रकाशात आणली. इतिहास अभ्यासक राम यादव यांनी गडाच्या संशोधनातून पावनगडासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी उजेडात आणल्या. त्यातून हणमंत आणि दक्षिण दरवाज्यांची छायाचित्रे उपलब्ध झाली. त्यावरूनच दक्षिण दरवाज्याचे महत्त्व विषद करणारे अवशेष दृष्टीस पडले. दरवाज्याची रचना बुरुजामधून पण सहजासहजी दृष्टीस न पडणारा, नागमोडी वळणाने किल्ल्यात जाण्यासाठी प्रमुख मार्ग होता असा एकमेव दरवाजा असावा, असा अंदाज आहे.

या दरवाज्याच्या माहितीचा ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्यांसाठी उजेडात यावा या हेतूने रविवारी पावनगडावरील दक्षिण दरवाज्याच्या अवशेषांची स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे दक्षिण दरवाज्याचे सध्या अस्तित्वात असणारे अवशेष उजेडात आले. उपलब्ध चित्रानुसार गडावरील एका बुरुजामधील असणारा हा दरवाजा. बुरुज ढासळला तरी त्या दरवाज्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आजही नजरेत भरते. त्याचबरोबर भग्न बुरुजाच्या अवशेषावरून त्या बुरुजाचा डोलारा भक्कमपणे नजरेत भरतो.

स्वच्छता मोहिमेत इतिहास अभ्यासक राम यादव, इतिहास व मोडी अभ्यासक अमित आडसुळे, रविराज कदम, अनिकेत जाधव, अभिजित सूर्यवंशी, रोहित पाटील, अमित कातवरे, सुजित जाधव, प्रसाद पाटील, देवेंद्र भोसले, दिगंबर भोसले, आशुतोष सूर्यवंशी, सूरज गणाचार्य, वैभव भोसले, गणेश खोडके यांनी सहभाग घेतला.

पावनगड हा वनखात्याच्या अखत्यारित असून पुरातत्त्व यादीत नाही. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार वास्तुचे जुने चित्र उपलब्ध आणि अवशेष शिल्लक असतील तर अशा वास्तुची पुराभिलेख विभागामार्फत डागडुजी करता येते. या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही तग धरुन आहेत. त्याचे चित्रही उपलब्ध आहे. पावनगडाचा दक्षिण दरवाजा पुन्हा दुरुस्त करून सर्व शिवप्रेमी, गडप्रेमींना पाहता यावा त्याबरोबर पावनगड किल्ल्याची नोंद राज्य पुरातत्त्व खात्याच्या यादीत करावी, अशी मागणी श्री शिवाजी मºहाठा फौंडेशनच्यावतीने केली आहे.
 

 


Web Title: The existence of the South Door in the Pawangand Cleanliness campaign
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.