‘सुंदर’ हत्तीला आज केरळला हलविणार

By admin | Published: June 1, 2014 01:29 AM2014-06-01T01:29:22+5:302014-06-01T01:30:05+5:30

वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून हालचाली सुरू

The elephant will move to Kerala today | ‘सुंदर’ हत्तीला आज केरळला हलविणार

‘सुंदर’ हत्तीला आज केरळला हलविणार

Next

वारणानगर : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील व सध्या वारणा समूहाकडे देखभालीसाठी असलेला ‘सुंदर हत्ती’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अखेर उद्या, रविवारी वारणेतून केरळ येथील बाणेरगठ्ठा येथे नेण्याच्या हालचाली वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून सुरू केल्या आहेत. वारणा समूहाने जोतिबा देवास भेट दिलेल्या ‘सुंदर’ हत्तीचा विषय देशपातळीवर गाजत आहे. ‘पेटा’ या संस्थेने दीड वर्षांपासून या हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करून प्राणी संग्रहालयात सोडावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, ‘सुंदर’ अगदी चांगल्या वातावरणात आहे. त्याची प्रकृती ठणठणीत आहे. त्याच्याबद्दल ‘पेटा’ चुकीची माहिती सादर करीत असल्याची याचिका वारणा समूहानेही न्यायालयात दाखल केली होती; परंतु दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘सुंदर’ला कर्नाटकातील बाणेरगठ्ठा पार्कमध्ये सोडण्याचे आदेश वन विभागास दिले होते. त्यामुळे आज, शनिवारी ‘सुंदर’च्या पुढील कार्यवाहीसाठी हालचाली घडल्या. उद्या, रविवारी वनविभागाच्या एम. टी. राव यांच्यासह वन विभागाची एक टीम सकाळी वारणेत येणार असून, ‘सुंदर’च्या प्रकृतीची पाहणी करणार आहे. त्यावेळीच ‘सुंदर’ला हालविण्याचा योग्य तो निर्णय होणार आहे. दरम्यान, वनविभागाकडून कोडोली व पेठवडगाव पोलीस ठाण्यांनाही पत्र देऊन मदतीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The elephant will move to Kerala today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.