पडळमध्ये प्रेमी युगुलाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:44 PM2017-11-01T12:44:03+5:302017-11-01T12:54:11+5:30

पडळ (ता. पन्हाळा) येथील एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री आठनंतर पडळशेजारील डोंगरातून अत्यवस्थ असलेल्या या दोघांनाही शोधून रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.मुलगी अल्पवयीन असून ती कऱ्हाडची आहे.

Efforts to commit suicide by eating lover's poison in the fall | पडळमध्ये प्रेमी युगुलाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पडळमध्ये प्रेमी युगुलाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी कऱ्हाडची, दोघांची प्रकृती गंभीरघरच्यांचा प्रेमप्रकरणाला विरोध यापूर्वीही दोघेही घरातून पळून गेले होते

कोल्हापूर ,दि. १ : पडळ (ता. पन्हाळा) येथील एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री आठनंतर पडळशेजारील डोंगरातून अत्यवस्थ असलेल्या या दोघांनाही शोधून रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मुलगी अल्पवयीन असून ती कऱ्हाडची आहे.


ही मुलगी पडळ येथे आपल्या मामाकडे राहत होती. तिथे एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले; परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने विशालच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होता. यापूर्वी हे दोघेही घरातून पळून गेले होते. या प्रकरणी विशालविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याची जामिनावर सुटका झाली होती.


याच दरम्यान ही मुलगी कऱ्हाडला आपल्या घरी गेली होती. मंगळवारी दुपारनंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या पालकांनी पडळ येथे फोन केला असता विशाल हादेखील घरी नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पालकांनी मुलीला फोन लावला असता या तिने आम्ही दोघांनी पडळच्या डोंगरात विष घेतले असल्याचे सांगितले.


यानंतर पडळ ग्रामस्थांनी डोंगरामध्ये शोधाशोध करून या दोघांनाही विष प्यायलेल्या अवस्थेत सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. सीपीआर पोलीस चौकीत याबाबत वर्दी देण्यात आली असून, मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशालचीही प्रकृती गंभीर आहे. या दोघांच्याही नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 

 

Web Title: Efforts to commit suicide by eating lover's poison in the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.