दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:21 AM2018-03-19T00:21:16+5:302018-03-19T00:21:16+5:30

Doctors' diabetes, the balance of blood pressure, is bad? | दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

Next


कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? असा प्रश्न पडल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी सायंकाळी येथे लगावला. त्याचबरोबर भाजप सरकार हे सूडभावनेतून सीआयडी, सीबीआय, ईडीच्या माध्यमातून छापे टाकून कॉँग्रेसच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ताराबाई पार्क येथील राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात २ व ३ एप्रिलच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी १५ हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला; परंतु हे तुटीचे पैसे कशातून भरून काढणार हा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस पालकमंत्री पाटील यांचा मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडल्याचे दिसत आहे. त्यांना सल्ला आहे की, त्यांनी जरा सबुरीने घ्यावे; तसेच त्यांचा मधुमेह व रक्तदाब संतुलित राहावा, अशा गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, हल्लाबोल आंदोलनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषद अध्यक्ष धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, असे राष्टÑवादीचे नेते येणार आहेत. कोल्हापुरातील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, तसेच सरकारवर नाराज असलेल्या कर्मचाºयांनाही निमंत्रित करावे. के. पी. पाटील म्हणाले, राष्टÑवादीचे हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी व आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी. मुश्रीफ हे फक्त कागलचे आमदार नसून जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवसाला जिल्हाभरात लावलेले फलक हल्लाबोल आंदोलनापर्यंत कायम ठेवावेत.
ए. वाय. पाटील म्हणाले, चार वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराने सर्व घटक नाराज आहेत. ते हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून मांडायचे आहे. यावेळी उपमहापौर सुनील पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहराध्यक्ष राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, माजी महापौर आर. के. पोवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, आदी उपस्थित होते.

वाढदिवसासाठी खिशात हात घालावा
जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या खिशात हात घालून आपल्या परीने साजरा करावा, त्यासाठी वर्गणी गोळा करून गालबोट लावू नये, असे लाटकर यांनी सांगितले.
हळदीच्या पडझडीची काळजी नाही
हळदी (ता. करवीर) येथे राष्टÑवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी सायंकाळी भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होता. हा धागा पकडत हळदीत काही पडझड झाली असली तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही; कारण करवींर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनासाठी येणार आहेत व आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीची शर्यत आयोजित केल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.
जिल्हा बॅँकांच्या बरखास्तीची भाषा
जिल्हा बॅँकांनी यापूर्वी सेवा संस्थांकडून व्याज वसूल केले आहे; परंतु सरकारकडून पुन्हा हे व्याज घ्यावे, असे जिल्हा बॅँकांना सांगितले आहे. हे शक्य नसल्याचे सांगायला गेल्यावर सरकारकडून बॅँका बरखास्तीची भाषा केली जात असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.

Web Title: Doctors' diabetes, the balance of blood pressure, is bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.