शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:07 AM2018-02-07T01:07:12+5:302018-02-07T01:07:56+5:30

Do not be surprised if Shetty joins Congress: Amit Deshmukh: Not a grouping in the Congress, Positive Contest | शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

Next
ठळक मुद्देअर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयवंतराव आवळे, दिनकरराव जाधव, बाळासाहेब सरनाईक, विशाल पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’ कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, बजरंग पाटील, राजेश पाटील, आदींची होती.

देशमुख म्हणाले, सध्या देश व राज्य ज्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. या अर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना आहे.ते म्हणाले, कॉँग्रेस पक्षात गटबाजी नसून ती सकारात्मक स्पर्धा आहे. येणाºया काळात सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशभर सरकारविरोधात समविचारी पक्ष एकत्र येत असून यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको.

पोस्टरबाजीने विकास होत नाही
सध्या कोल्हापुरात राज्यातील मोठा मंत्री असूनही कुठलाही प्रश्न सुटल्याचे दिसत नसल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता देशमुख यांनी हाणला. नुसत्या विकासकामांच्या पोस्टरबाजीने विकास होत नाही, तर खºया अर्थाने सर्वसामान्य माणसाला त्याचा स्पर्श होणे गरजेचे आहे.

खडसे, राणेंच्या प्रश्नाला बगल
भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या कॉँग्रेस प्रवेशाबाबत तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुन्हा कॉँग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नाला देशमुख यांनी बगल देत, हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने आपण बोलणे उचित नसल्याचे सांगितले.

ऊसदरप्रश्नी सरकारने बैठक घ्यावी : राज्यात सध्या ऊसदर, एफआरपी, साखरेचे घसरलेले दर असे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून बैठक घेऊन मार्ग काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने बैठक घ्यावी, अन्यथा शेतकरी, कारखानदार अडचणीत येतील, असे देशमुख यांनी सांगितले.


पक्षांतर केलेल्यांचा भ्रमनिरास
कॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्वजण पुन्हा कॉँग्रेसमध्ये आल्याचे दिसतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

Web Title: Do not be surprised if Shetty joins Congress: Amit Deshmukh: Not a grouping in the Congress, Positive Contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.