‘व्हीव्हीपॅट’बाबत ९२४ ठिकाणी प्रात्यक्षिके-आतापर्यंतची स्थिती : जिल्ह्यासाठी ४२५७ मशीन्स प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 07:09 PM2019-01-07T19:09:21+5:302019-01-07T19:10:13+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर होत आहे. जिल्ह्यासाठी ४२५७ मशीन्स प्राप्त झाली असून, त्यांचा वापर कसा करायचा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावागावांत आणि

Demonstrations at 924 places of 'VVPat' - Present Status: Receiving 4257 Machines for the District | ‘व्हीव्हीपॅट’बाबत ९२४ ठिकाणी प्रात्यक्षिके-आतापर्यंतची स्थिती : जिल्ह्यासाठी ४२५७ मशीन्स प्राप्त

‘व्हीव्हीपॅट’बाबत ९२४ ठिकाणी प्रात्यक्षिके-आतापर्यंतची स्थिती : जिल्ह्यासाठी ४२५७ मशीन्स प्राप्त

Next
ठळक मुद्देगावागावांत अन् मतदान केंद्रांवर होतेय मतदारांची जनजागृती

- प्रवीण देसाई ।

‘वारे निवडणुकीचे’-- (उत्तरार्ध)
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर होत आहे. जिल्ह्यासाठी ४२५७ मशीन्स प्राप्त झाली असून, त्यांचा वापर कसा करायचा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावागावांत आणि मतदान केंद्रांवर प्रात्यक्षिकांद्वारे मतदारांचे जनजागरण सुरू केले आहे. २० डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत गाव अन् गाव पिंजून काढले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९२४ ठिकाणी प्रात्यक्षिके झाली असून, यामध्ये ८४ हजार ८५७ मतदारांनी सहभाग घेतला आहे.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची ७३२१ बॅलेट्स, ४२५७ कंट्रोल युनिट्स व ४२५७ व्हीव्हीपॅट मशीन्स प्राप्त झाली आहेत. त्यांच्या प्राथमिक तपासणीचे काम पूर्ण झाले. व्हीव्हीपॅट मशीनचा निवडणुकीत पहिल्यांदाच वापर होत आहे; त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन आपल्या बहुमोल हक्कांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला निवडणूक विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना या मशीनबाबत प्रशिक्षण दिले व त्यानंतर चाचणीद्वारे मतदानही घेण्यात आले. मतदारांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये १० विधानसभा मतदारसंघांसाठी २० व्हॅनच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांसह प्रबोधनाचे काम सुरू केले आहे.

या व्हॅनमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संच व एक राखीव संच ठेवला आहे. यासोबत मंडल अधिकारी, तलाठी दर्जाच्या नोडल अधिकाºयाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, ग्रामसेवक व इतर दोन कर्मचारी अशा पाचजणांचे पथक कार्यरत आहे. दररोज जिल्ह्यातील सरासरी १०० गावे पिंजून काढली जात आहेत. यावेळी आठवडी बाजार, गजबजलेले चौक व वर्दळीचे भाग, सामाजिक व सांस्कृतिक हॉल, शाळा, ग्रा.पं.च्या इमारती, मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’द्वारे थेट मतदानप्रक्रिया राबवूनच प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. या माध्यमातून मतदारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.

‘व्हीव्हीपॅट’वापरासाठी अभिरूप मतदानाद्वारे झाली रंगीत तालीम
येत्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी
१६ नोव्हेंबरला केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान घेण्यात आले.
सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत २०० कर्मचाºयांनी हक्क बजावल्याने
१ लाख ६८ हजार इतक्या मतदानाची नोंद झाली.
चिठ्ठीसाठी थर्मल पेपर
व्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या मतदानाच्या चिठ्ठीसाठी थर्मल पेपरचा वापर करण्यात आला आहे.
किमान १० वर्षे टिकेल अशा
पद्धतीचा कागद व शाई असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात ३६ मतदान केंद्रांची भर
जिल्ह्यातील १0 विधानसभा मतदारसंघांत सध्या ३२८५ मतदान केंद्रे असून, मतदार यादी कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित वाढीव मतदार लक्षात घेता आणखी ३६ मतदान केंद्रांची भर पडली असून, ती आता ३३२१ इतकी होणार आहेत.


 

Web Title: Demonstrations at 924 places of 'VVPat' - Present Status: Receiving 4257 Machines for the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.