कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:44 AM2017-08-17T00:44:57+5:302017-08-17T00:45:00+5:30

Debt waiver farmers will be seven-bracketed | कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत व जिल्हाधिकाºयांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्री खोत म्हणाले, महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कजर्माफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नवनवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.
यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन नीळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय), सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी, नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृद्धी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. लीला सुनील महापुरे यांचा, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाºया अमित दळवी, राजू सूर्यवंशी, पॉवर फॉर पीपल्स फाऊंडेशन (गारगोटी), इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.
जिल्ह्यातील २१६ पाणंद रस्ते झाले मोकळे
सातबारा संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून ३ लाख ६९ हजार ५२ दाखले वितरित करण्यात आले तर जवळपास २४० किलोमीटर लांबीचे २१६ अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. त्याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्णात रस्ते सुधारणा, रूंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे, असे खोत यांनी सांगितले.
२९, ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान
गेल्या तीन वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून २९ व ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खोत यांनी केले.
‘जलयुक्त’मधून ९ हजार टीसीएम पाणी
जिल्ह्णात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत ५२ कोटी रुपये खर्च करून १ हजार ६८८ कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यातून सुमारे ९ हजार टीसीएमपेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे खोत यांनी सांगितले.

Web Title: Debt waiver farmers will be seven-bracketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.