पेठवडगावमध्ये ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:15 AM2018-11-26T01:15:21+5:302018-11-26T01:15:26+5:30

पेठवडगाव : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर वडगाव येथील जुन्या वारणा बझारसमोर मालट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात बहीण-भाऊ ठार झाले तर ...

Death of sister and brother in Pethwdgaon truck crash | पेठवडगावमध्ये ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू

पेठवडगावमध्ये ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू

Next

पेठवडगाव : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर वडगाव येथील जुन्या वारणा बझारसमोर मालट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात बहीण-भाऊ ठार झाले तर आई, वडील गंभीर जखमी झाले. अफान मोहसीन शेख (वय ४), शुक्राना मोहसीन शेख (१२) अपघातात ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत तर मोहसीन हारुण शेख (३५), रिजवाना मोहसीन शेख (३० सर्व रा. भादोले, ता. हातकणंगले) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत वडगांव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भादोले येथील शेख कुटुंबीय हातकणंगले येथून मोटारसायकलवरून परत येत होते. दुपारी वडगांवमार्गे भादोलेकडे मोटारसायकल (क्र. एम. एच. ०९ सी. जी. ५३०९)वरून परतताना मागून रिकामा मालवाहतूक ट्रक (क्र. एम.एच.०९ सीए ३१२४) हातकणंगले येथून शाहूवाडीला निघाला होता. भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागील बाजूने धडक दिली. या अपघातात अफहान याच्या डोक्यावरून ट्रकचे डाव्या बाजूचे चाक गेले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर शुक्रानासह मोहसीन, रिझवाना गंभीर जखमी झाले. दरम्यान, तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्राना उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर मोहसीन यांच्या हात, चेहऱ्याला, छातीला तर रिझवाना यांच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी व हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला तर दोन भावंडांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी नवे पारगांव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. घटनास्थळी वाहतुकीची कोंडी व बघ्यांनी गर्दी केली होती. अपघातस्थळी भादोले येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच वडगांव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करत आहेत.

Web Title: Death of sister and brother in Pethwdgaon truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.