शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:09 PM2017-10-26T23:09:54+5:302017-10-26T23:14:44+5:30

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे

Counting land without notice to farmers - Kolhapur-Ratnagiri highway | शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग

शेतकºयांना नोटीस न देताच जमीन मोजणी-- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग

googlenewsNext
ठळक मुद्दे सात दिवस अगोदर नोटीस लागू करावी असा शासनाचा कायदा सांगतो. शेतीवर उपजीविका करणाºया शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार आहेजिल्हाधिकारी कार्यालयाने एक महिन्यापूर्वी जनसुनावणी घेतली होती

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकºयांना नोटिसा न देता येलूर (ता. शाहूवाडी) येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाºयांनी मोजणी सुरू केली आहे. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी शेतकºयांना वेळेत नोटीस द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तालुतालुक्यातून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे.क्यातून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे.

शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे, पेरीड, येलूर, जाधववाडी, निळे, वारूळ, आंबा, चनवाड, शाहूवाडी, करंजोशी या गावांतून हा महामार्ग जात आहे. या गावांतील शेतकºयांची जमीन रस्त्यात जाऊन बाधित होणार आहे. मात्र, शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित शेतकरी यांना भूसंपादनाच्या रीतसर सात दिवस अगोदर नोटीस लागू करावी असा शासनाचा कायदा सांगतो.

शाहूवाडी तालुक्यातील तलाठी यांच्याकडे नोटीस देण्याची जबाबदारी होती. मात्र, तलाठी यांनी आपले खासगी नेमलेले पंटर यांच्याकडे नोटीस देण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी शेतकºयांना नोटीस दिलेली नाही. जुन्या नकाशावर काम चालू आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महिन्यापूर्वी जनसुनावणी घेतली होती. त्या सुनावणीच्या नोटिसादेखील सर्व शेतकºयांना दिल्या नाहीत. शेतीवर उपजीविका करणाºया शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने रीतसर जमिनीचे भूसंपादन करावे व आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा. रस्त्याला आमचा विरोध नाही; मात्र महसूल विभागाने आपला भोंगळ कारभार सुधारावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.

 

शासनाच्या महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी भूसंपादन करण्यासाठी जागेवर हजर राहणे बंधनकारक असताना खासगी कर्मचारी मोजणी कशी करतात? शेतकºयांना वेळेवर नोटीस देणे बंधनकारक आहे.
- जयवंतराव काटकर,
माजी जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Counting land without notice to farmers - Kolhapur-Ratnagiri highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.