कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठकीवर काँग्रेस आमदारांचा बहिष्कार, निधी वाटप धोरणाविरोधात न्यायालयात जाणार

By समीर देशपांडे | Published: January 8, 2024 11:08 AM2024-01-08T11:08:16+5:302024-01-08T11:10:23+5:30

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या आज, सोमवारी होणाऱ्या बैठकीवर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते ...

Congress MLAs boycott Kolhapur District Planning Committee meeting | कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठकीवर काँग्रेस आमदारांचा बहिष्कार, निधी वाटप धोरणाविरोधात न्यायालयात जाणार

कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठकीवर काँग्रेस आमदारांचा बहिष्कार, निधी वाटप धोरणाविरोधात न्यायालयात जाणार

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या आज, सोमवारी होणाऱ्या बैठकीवर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. महायुतीच्या विरोधकांना विकास निधी न देण्याच्या या धोरणाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देण्यावरून वाद सुरू आहे. महायुती सरकारने सत्तारूढ तिन्ही पक्षांना प्रत्येकी प्रत्येकी 27%, विरोधी आमदारांना दहा टक्के आणि पालकमंत्र्यांना नऊ टक्के विकास निधी अशा पद्धतीने निधीची वाटपाचे धोरण ठरवले आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विरोधकांना निधीच द्यायचा नाही ही भूमिका घातक असून याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

लवकरच या महायुती सरकारच्या विकास निधी वाटपाच्या धोरणा विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान नियोजन समितीची ही बैठक वादळी होण्याची शक्यता गृहीत धरून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Congress MLAs boycott Kolhapur District Planning Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.