सिद्धार्थनगरातून पटकारे,पद्माराजे उद्यान प्रभागांतून राऊत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:11 AM2019-06-24T11:11:49+5:302019-06-24T12:09:02+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले. येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. जय पटकारे यांना १५८0 मते मिळाली तर अजित राऊत यांना १७0६ मते मिळाली.

Congress leader Jay Patkar, NCP's Ajit Raut wins from Padmaraj park | सिद्धार्थनगरातून पटकारे,पद्माराजे उद्यान प्रभागांतून राऊत विजयी

सिद्धार्थनगरातून पटकारे,पद्माराजे उद्यान प्रभागांतून राऊत विजयी

Next
ठळक मुद्देसिद्धार्थनगरातून काँग्रेसचे जय पटकारे, पद्माराजे उद्यान प्रभागांतून राष्ट्रवादीचे अजित राऊत विजयीमहापालिका पोटनिवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले.
येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. जय पटकारे यांना १५८0 मते मिळाली तर अजित राऊत यांना १७0६ मते मिळाली.

दोन्हीही प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमुळे शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ परिसरांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सिध्दार्थनगर प्रभागात सुमारे ६०.९४ टक्के तर पद्माराजे उद्यान प्रभागात ५८.९३ टक्के मतदान झाले होते.


अजित राऊत

प्रभागनिहाय उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

सिद्धार्थनगर प्र. क्र. २८ - ताराराणी आघाडीचे नेपोलियन अशोक सोनुले यांना १२0९ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार सुशिल सुधाकर भांदिगरे यांना ८४0 मते मिळाली. काँग्रेसचे जय बाळासो पटकारे यांना १५८0 मते मिळाल्याने ते  ३७१ मतानी विजयी झाले. ३३ मते नोटासाठी मिळाली.

पद्माराजे उद्यान प्र. क्र. ५५- शिवसेनेचे पीयूष मोहन चव्हाण यांना ६४३, शेकापचे स्वप्निल भीमराव पाटोळे यांना १७२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित विश्वास राऊत यांना सर्वाधिक १५८0 मते मिळाली. ते  १०६३ मतानी विजयी झाले.

 या प्रभागात तीन अपक्ष उभे राहिले होते. त्यातील महेश शंकरराव चौगले यांना ३४४, शेखर महादेव पोवार यांना १२५ आणि राजेंद्र वसंतराव चव्हाण यांना ३३४ मते मिळाली. २२ मते या प्रभागात नोटाला मिळाली.

शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठ या पेठांचे कोल्हापुरात राजकीय वजन आहे. दोन्हीही पेठांनी महापालिकेच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव ठेवला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही पेठांत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

महापौर निवडणुकीसाठी दोन्हीही जागा महत्त्वाच्या असल्याने नेत्यांची घालमेल सुरू होती. पद्माराजे उद्यान प्रभागात सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या केंद्राव रराष्ट्रवादीचे आर. के. पोवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील तसेच ऋतुराज क्षीरसागर हे ठिय्या मारून होते तर सिद्धार्थनगर मतदान केंद्रावर ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, तर काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुलाणी, मोहन सालपे थांबून होते.

Web Title: Congress leader Jay Patkar, NCP's Ajit Raut wins from Padmaraj park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.