गडकोटांमुळे आपले साम्राज्य अबाधित  : कर्नल अमरसिंह सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:21 AM2019-05-13T11:21:18+5:302019-05-13T11:22:36+5:30

देशाचे साम्राज्य केवळ गडकोटांमुळे अबाधित राहिले आहे. त्यात दक्षिणेतील किल्ले महत्त्व आजही अधोरेखित ठरले आहे, असे मत कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट (पेठवडगाव)तर्फे आयोजित केलेल्या ‘दक्षिण दिग्विजय’ गड-किल्ले प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Colonial Amar Singh Sawant | गडकोटांमुळे आपले साम्राज्य अबाधित  : कर्नल अमरसिंह सावंत

 कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या ‘दक्षिण दिग्विजय’ गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शनास सुरुवात झाली.  (छाया : नसीर अत्तार )

Next
ठळक मुद्देगडकोटांमुळे आपले साम्राज्य अबाधित  : कर्नल अमरसिंह सावंत‘दक्षिण दिग्विजय’ गड-किल्ले फोटो प्रदर्शनास सुरुवात

कोल्हापूर : देशाचे साम्राज्य केवळ गडकोटांमुळे अबाधित राहिले आहे. त्यात दक्षिणेतील किल्ले महत्त्व आजही अधोरेखित ठरले आहे, असे मत कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट (पेठवडगाव)तर्फे आयोजित केलेल्या ‘दक्षिण दिग्विजय’ गड-किल्ले प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आजपर्यंतच्या देशातील अनेक राजांनी गड, किल्ल्यांचे महत्त्व जाणले होते. विशेष म्हणजे बाहेरील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, महसूल जमा करण्यासाठी, रयतेची सुरक्षा आणि बाहेरील आक्रमणे थोपविण्यासाठी गडकिल्ले महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामुळे आजही हीच पद्धती लष्करातही अवलंबिली जात आहे.

लाईन आॅफ कंट्रोल ७३० किलोमीटरचे आहे. यात उंचावरील ठिकाणांवरून आपण सर्वत्र लक्ष ठेवू शकतो. यावेळी सांगळे यांनी अथक परिश्रमातून गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील गडकोटांचे महत्त्व आपल्या छायाचित्रणातून जगासमोर आणल्याबद्दल सावंत यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. हे चित्र प्रदर्शन १८ मे अखेर सुरू राहणार आहे.

यावेळी लिंगाणा विक्रमवीर सागर नलवडे, शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव, इतिहास अभ्यासक राम यादव, हेमंत साळोखे, पंडित कंदले, आदी उपस्थित होते.

हे गडकोट छायाबद्ध

आग्वेद, अलोनी, मार्मागोवा, काबेदराम, कार्जएम, कोलवाले, रेडमागोस, चापोरा (गोवा), वल्लभगड, तोरगळ, सौंदती, राजहंसगड, उच्चागीदुर्ग, कित्तुर, ऐहोळ, विजापूर, परसगड, गुलबर्गा, बिदर, बदामी, मुडगल, यादगीर, बसव कल्याण, इटकलगड, बेल्लारी, शाहपूर, मुंदरगी, राजेंद्र गड, बहादुरगड, नारगुद, चलागिरी, अनेगुंदी, कोप्पाळ, हम्पी, मिर्जन, कांजराबाद, देवरायन्ना दुर्ग, निजगलबेटा, हत्नीदुर्ग, कवलेदुर्ग, निडगल, मेलकोटे, भस्मांगी, मेडिगेसा, गडीबंडा, नदीदुर्ग, गुम्मनायका, रत्नगिरी, मुलबागील, देवनहळ्ली, चेन्नरायचन्नादुर्ग, सावनदुर्ग, शिवगंगा, सिरा, श्रीरंगपट्टण, जमलाबाद, पाणागड, महुगिरी, बेल्लूर, चित्रदुर्ग (कर्नाटक), चंद्रगिरी, बेकल, पल्लकंड, सेंट अ‍ॅजोले (तमिळनाडू) , जिंजी, विल्लमुज, गोजरा, साजरा, तंजावर, नमकुल्ल, दिंडीगल, तिरूमयम, संकागिरी, रंजनकुडी (केरळ), मडकसिरा, जैनकोंडा, कुंदुरपी, गडीबंडा, गुटी, गडीकोटा, उदयगिरी (आंध्र प्रदेश), गोलकोंडा, भवनगिरी, गुरमकोंडा, मेदक, चंद्रगिरी, वरंगळ (तेलंगणा) हे गडकिल्ले छायाचित्रबद्ध केले आहेत.

 

 

Web Title: Colonial Amar Singh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.