जिल्हा परिषदेच्या शाळेत 2ऑक्टोबर रोजी स्वच्छता मतदान उपक्रम : शौमिका महाडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:03 PM2017-10-01T13:03:40+5:302017-10-01T13:08:34+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये पाणी व स्वच्छता विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मतदान 2017 हा उपक्रम दि. 2 ऑक्टोबर 2017 रोजी इयत्ता 4 थी ते 8 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणार आहे. स्वच्छता मतदानामध्ये एकूण 2002 जि.प. शाळामधील इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील 89,171 विद्यार्थी स्वच्छतेबाबतचे आपले मत या मतदानातून देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

Cleanliness polling activity at Zilla Parishad School on October 2: Shohimika Mahadik | जिल्हा परिषदेच्या शाळेत 2ऑक्टोबर रोजी स्वच्छता मतदान उपक्रम : शौमिका महाडीक

जिल्हा परिषदेच्या शाळेत 2ऑक्टोबर रोजी स्वच्छता मतदान उपक्रम : शौमिका महाडीक

Next
ठळक मुद्दे गांधी जयंती दिवशी स्वच्छता मतदान शालेय विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम मतपत्रिका निश्चित, स्वच्छतेविषयक प्रश्नांची विचारणा मतदान प्रक्रियेची जबाबदारी शिक्षक,मुख्याध्यापक घेणार

     कोल्हापूर, दि. 30 :  जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये पाणी व स्वच्छता विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतामतदान2017  हा उपक्रम दि. 2 ऑक्टोबर 2017 रोजी इयत्ता 4 थी ते 8 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणार आहे. स्वच्छता मतदानामध्ये एकूण 2002 जि.प. शाळामधील इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील 89,171 विद्यार्थी स्वच्छतेबाबतचे आपले मत या मतदानातून देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

        संपूर्ण देशभरात दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध स्वच्छता विषयक उपक्रमांच्या माध्यतातून स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे. यातीलच एक उपक्रम म्हणून दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी स्वच्छता मतदान हा शालेय विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले..

       शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती होण्याबरोबरच स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वच्छते विषयीचे त्यांचे मत मांडता यावे यासाठी स्वच्छता मतदान घेतले जाणार आहे.

         स्वच्छता मतदानासाठी आठ प्रश्नांची मतपत्रिका निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये स्वच्छतेविषयक प्रश्नांची विचारणा करण्यात आलेली आहे. या प्रश्नांच्या पूढे त्यासाठी सूचक चिन्ह नमूद केलेले असुन त्यापूढे होय किंवा नाही या अर्थाची खुण विद्यार्थ्यांने नमूद करावयाचे आहे. मतदान प्रक्रियेची सर्व जबाबदारी शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

Web Title: Cleanliness polling activity at Zilla Parishad School on October 2: Shohimika Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.