लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:13 AM2018-06-09T00:13:30+5:302018-06-09T00:13:30+5:30

कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली.

Cleanliness of the Kadvi river from the people's participation, between two and a half kilometers between the revival-kerle to Ghalsavade-Chandoli. | लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

googlenewsNext
ठळक मुद्देमोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता

आंबा : कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. १ ते ५ मे दरम्यान मोहिमेच्या जागृतीसंदर्भात शेतकºयांच्या बैठका घेऊन दि. १० मे ते ५ जून या काळात मोहीम राबविली. चांदोलीच्या पुढील लव्हाळा, वारूळ, जावली या भागातील नदीची सफाई पुढीलवर्षी तिसºया टप्प्यात केली जाणार आहे. त्यादरम्यान शेतकºयांच्या भेटी घेऊन नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व रुजविले जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.

कडवी नदीपात्रात गवत, झुडपे माजून, मातीचे ढीग (कुरव) पसरल्याने थोड्याशा पावसाने पाणी पात्राबाहेर पडून शिवाराची हानी होत होती. तसेच महामार्गावर पाणी येऊन अपघात घडत. म्हणून ‘लोकमत’ने या समस्येवर आवाज उठवून, कडवी खोºयातील शेतकºयांमध्ये जागृती केली. गेल्या वर्षापासून नदी पुनरुज्जीवनाची मोहीम राबविली जात आहे. काही ठिकाणी नदीचे पात्र साठ फूट, तर काही ठिकाणी शेतकºयांच्या अतिक्रमणामुळे तेच पात्र दहा फुटांवर शिल्लक राहिले होते. घोळसवडे पुलापासून ते चांदोली, घोळसवडे, धाऊडवाडा व जावली धाऊडवाडा येथील शेतकºयांची शिवारे कडवी नदीच्या दोन्ही काठांवर आहेत. या दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्रात शेतकºयांचे श्रमदान व लोकसहभागातून निधी जमवून जेसीबीच्या सहाय्याने पात्र चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत रुंद केल्याने या परिसरातील शिवारात पाणी येऊन शेतीचे होणारे नुुकसान थांबणार आहे.
मानोली ते मलकापूर अशी सतरा किलोमीटरची कडवी नदी पश्चिम भागातील ३५ गावांची जीवनवाहिनी आहे. मानोली ते वारुळ या दरम्यानच्या नऊ किलोमीटर नदीपात्रात सफाईचे मोठे काम आहे. उर्वरित कामास शासकीय निधी मिळविण्यासाठी तांत्रिक विकास आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे चांदोलीचे सरपंच नामदेव पाटील व संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.


तहसीलदारांची जागृती
1 नदी स्वच्छता मोहिमेत शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शेतकºयांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्याची भूमिका तहसीलदार चंद्रशेखर सानप गेली दोन वर्षे पार पाडत आहेत. दुसºया टप्प्यातील दीड किलोमीटरचे पात्र स्वच्छ झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मोहिमेला भेट देऊन जेसीबीचे सहकार्य केले. तसेच या मोहिमेला पाठबळ दिले.
2 परिसरातील तरुण मंडळ व पत्रकार संघ, पाटबंधारे विभाग यांची या विधायक मोहिमेत मोलाची साथ मिळत आहे. स्वच्छतेबरोबर नदीचे नदीपण जपणारी काळजीवाहू समिती स्थापन करून नदीच्या प्रदूषणावर प्रतिबंध करून रुंद केलेल्या नदीपात्राच्या काठावर शेतकºयांच्या सहकार्यातून वृक्षारोपणाचे काम राबविले जाणार आहे.

तीन गावांमध्ये जलसंधारणाला जोड
नदीविकास आराखड्यास शिवाजी विद्यापीठाचे मार्गदर्शन.
९२ तासांचे जेसीबीने खोदकाम.
चांदोलीतील शेतकºयांचे श्रमदान.
कडवीच्या निगराणीसाठी काळजीवाहू तरुणांची समिती स्थापणार.
शिवाराची धूप रोखण्यासाठी स्थानिक जातीचे वृक्षारोपण.
डोहांच्या पुनरुज्जीवनातून जैवविविधतेचे संवर्धन.

Web Title: Cleanliness of the Kadvi river from the people's participation, between two and a half kilometers between the revival-kerle to Ghalsavade-Chandoli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.