अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता, विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:37 AM2017-09-19T04:37:02+5:302017-09-19T04:37:07+5:30

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. हे अलंकार शिलाहार, यादव, चंद्रहार, आदिलशाही अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण केले आहेत.

Cleanliness of Ambabai's regular ornaments, offering to Ambabai in the reign of various kings | अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता, विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण

अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता, विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण

Next

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. हे अलंकार शिलाहार, यादव, चंद्रहार, आदिलशाही अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण केले आहेत.
मंदिर परिसरातील गरुड मंडपात सकाळी देवस्थान समितीचे पारंपरिक दागिन्यांचे हवालदार महेश खांडेकर यांच्या उपस्थितीत दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. अंबाबाईचे किरीट, कुंडल, लप्पा, चिंचपेटी, सातपदरी कंठी, चारपदरी कंठी हे जडावाचे अलंकार आहेत, तसेच सोन्यात चंद्रहार, कुंडल, मोरपक्षी, लक्ष्मीहार, चाफेकळी, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, तनमणी, मोहराची माळ, पुतळी हार, श्रीयंत्र, मंगळसूत्र आदी अलंकार आहेत.

Web Title: Cleanliness of Ambabai's regular ornaments, offering to Ambabai in the reign of various kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.