चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:13 AM2018-04-30T00:13:26+5:302018-04-30T00:13:26+5:30

Cheating by Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

Next


कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी रविवारी कोल्हापुरात केली. आई-बापांच्या प्रश्नाचे
भांडवल करायचे आणि मलिदा मिळाला की त्यांना विसरायचे हे उद्योग बंद करा, अशा शब्दांत त्यांनी
शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर शरसंधान साधले.
डॉ. नवले म्हणाले, शेतकरी संपाची आग विझवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तर ‘लाँग मार्च’वेळी गिरीश महाजन यांचा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
‘लॉँग मार्च’च्या आंदोलनातून शेतकरी संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे. शेतकरी आई-बापाच्या प्रश्नांचे भांडवल करायचे आणि मलिदा दिसला की त्यांना विसरायचे, लाज वाटली पाहिजे. अहंकार व स्वत:च्या राजकारणासाठी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करण्याचे शुद्र राजकारण थांबवा. भाडोत्री सैन्यांवर नव्हे तर
घरचे खाऊन लढाई जिंकता येते,
ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.
‘स्वाभिमानी’ नाव लावणे वेगळे आणि प्रत्यक्षात जगणे वेगळे असा टोला लगावत आमदार, खासदारकी डोळ्यांसमोर ठेवून चौकात आणि चौकाबाहेर लढाई करण्याची नाटके बंद करा. राजकीय झेंडे, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून शेतकरी जमात म्हणून एकत्र या, असे आवाहन नवले यांनी केले.
मलाच उठाबशा काढायला लावल्या
शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांना एकत्र आणले, पण त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात यश आले नाही. मानापमान, एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात व जिरवण्यात ही मंडळी धन्यता मानतात. सगळ्यांच्या ताकदीवर सरकारला उठाबशा काढायला लावणार होतो, पण निमंत्रक म्हणून या शेतकरी नेत्यांनीच मला उठाबशा काढायला लावल्या, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा नवले यांनी समाचार घेतला.

Web Title: Cheating by Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.