मनपातील सत्तेत बदल अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:52 AM2019-02-20T00:52:21+5:302019-02-20T00:52:25+5:30

कोल्हापूर : केवळ चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने मनपात सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादीला पाठिंबा दिला असून, गेल्या तीन वर्षांत त्याच्या मोबदल्यात परिवहन ...

Change of power in the municipal power is impossible | मनपातील सत्तेत बदल अशक्य

मनपातील सत्तेत बदल अशक्य

Next

कोल्हापूर : केवळ चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने मनपात सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादीला पाठिंबा दिला असून, गेल्या तीन वर्षांत त्याच्या मोबदल्यात परिवहन समिती सभापतिपद पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप युती झाली असली, तरी मनपात निर्माण झालेले संबंध लगेच संपुष्टात येतील, असे दिसत नाही. शिवाय शिवसेनेने जरी सत्तारूढ गटाची साथ सोडली, तरी संख्याबळ पाहता लगेच सत्तांतर होणेही अशक्य आहे.
महानगरपालिकेत शिवसेनेचे केवळ चार, तर भाजपचे १४ नगरसेवक आहेत. तरीही सत्ताकारणात शिवसेनेने भाजपला वगळून कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला पाठिंबा दिला; त्यामुळे भाजपला येथे आपला महापौर करणे अशक्य झाले. नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अनेक मार्गाने शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनेने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे भाजपच्या जयश्री जाधव यांना महापौर होण्याची संधी गमवावी लागली. राज्यात सोमवारी शिवसेना-भाजप यांच्यात युती झाली; त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतही काही बदल घडणे अपेक्षित आहे; मात्र राज्यात एकीकडे युती होत असताना मनपात मात्र शिवसेनेचे अभिजित चव्हाण कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर परिवहन समितीचे सभापती झाले. त्यामुळे येथे त्यांचे सूत चांगले जमले आहे. भाजपला सत्ता काबीज करायची झाली, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीचे किमान चार नगरसेवक फोडावे लागतील; त्यासाठी पाच-सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

Web Title: Change of power in the municipal power is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.