भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा कोल्हापुरात निषेध : काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:08 PM2018-05-18T23:08:59+5:302018-05-18T23:08:59+5:30

कर्नाटक राज्यातील निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व जनता दल सेक्युलर (जेडीएस) या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला असतानाही राज्यपाल आणि केंद्र सरकारने भाजपला सत्ता स्थापण्याचे

BJP's anti-democracy protest in Kolhapur: Congress's demonstrations | भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा कोल्हापुरात निषेध : काँग्रेसची निदर्शने

भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा कोल्हापुरात निषेध : काँग्रेसची निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देकर्नाटकात सरकार स्थापनेबाबत भाजपला निमंत्रण देणे चुकीचे

कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील निवडणुकीमध्ये  राष्ट्रीय  कॉँग्रेस जनता दल सेक्युलर (जेडीएस) या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला असतानाही राज्यपाल आणि केंद्र सरकारने भाजपला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिले. हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याचे मत व्यक्त करीत या भूमिकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

भाजपच्या सत्तापिपासू धोरणाचा निषेध करण्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. ‘नहीं, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, ‘मोदी सरकार... हाय हाय’, ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि कोणत्या पद्धतीने भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे याचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असतानाही राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देणे अयोग्य आहे. इचलकरंजी शहर कॉँग्रेसच्यावतीने के. एल. मलाबादे चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली.

निषेधाचे फलक
‘बहुमतासाठी नाहीत आमदार ११२, भाजपने लोकशाहीचे वाजविले ३-१३’, ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’, ‘गोवा, मणिपूर, मेघालयात संधी बहुमत असलेल्या आघाडीला, मग कर्नाटकातच का राहावे काँग्रेस-जेडीएसने पिछाडीला?’ असे निषेधाचे विविध फलक घेऊन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Web Title: BJP's anti-democracy protest in Kolhapur: Congress's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.