ग्रामपंचायतींसाठी भुदरगडमध्ये मोर्चेबांधणी : पालकमंत्र्यांसह आजी, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:17 AM2018-05-09T00:17:53+5:302018-05-09T00:17:53+5:30

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी, हणबरवाडी, शिंदेवाडी, कोंडुशी, चांदमवाडी, निष्णप- कुंभारवाडी या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक, तर अंतीवडे, देवर्डे, देवकेवाडी, वरपेवाडी, अनफ खुर्द या पाच

Bharadagad front for gram panchayats: Advocates of former MLAs, grandmothers and grandmothers with Guardian Minister | ग्रामपंचायतींसाठी भुदरगडमध्ये मोर्चेबांधणी : पालकमंत्र्यांसह आजी, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचायतींसाठी भुदरगडमध्ये मोर्चेबांधणी : पालकमंत्र्यांसह आजी, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्देआबिटकर यांना रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येणार

शिवाजी सावंत।
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी, हणबरवाडी, शिंदेवाडी, कोंडुशी, चांदमवाडी, निष्णप- कुंभारवाडी या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक, तर अंतीवडे, देवर्डे, देवकेवाडी, वरपेवाडी, अनफ खुर्द या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ख्याती असलेल्या गारगोटी ग्रामपंचायतकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. या ग्रामपंचायतीवर आमदार प्रकाश आबिटकर यांची निविर्वाद सत्ता आहे. त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आबिटकर यांनी विकासकामांतून विरोधी गटापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी कोण कोणाबरोबर आघाडी करणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

भुदरगड तालुक्यात मोठा महसूल गोळा होणारी ग्रामपंचायत म्हणून गारगोटी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, मौनी विद्यापीठ शासकीय सदस्य अलकेश कांदळकर, माजी उपसरपंच सयाजी देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे, नंदकुमार शिंदे हे आपआपला गट सांभाळत हळुवारपणे चाचपणी करत आहेत. मतदारांचा कल पाहून व्यूहरचना करण्यात येत आहे. अजूनही कोणत्याही गटाने उघड आघाडी करण्यासाठी पवित्रा घेतलेला दिसत नाही.

मात्र, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन आमदार प्रकाश आबिटकर गटाला शह देण्यासाठी अंतर्गत आघाडी बांधणीचे काम सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार बंटी पाटील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. गारगोटी ग्रामपंचायतीवर ज्याची सत्ता, त्यांचा भुदरगड तालुक्यात राजकीय चांगला दबदबा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे २०१९ ला आमदारकीची निवडणूक असल्याने गारगोटी ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता कशी मिळवायची यासाठी कोणाबरोबर युती करायची याबाबत तिन्ही गटांचा विचारविनिमय सुरू आहे. पण एकला चलो असा सल्ला नेतेमंडळींना कार्यकर्ते देत आहेत.

पण नेते मात्र सावध भूमिका घेऊन सबुरीने चालले असल्याने निवडणूक तिरंगी की दुरंगी हे चित्र उमेदवारी माघारीच्या दरम्यान स्पष्ट होणार आहे. पण गारगोटी नगरपरिषद न झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी युवकांमधून इच्छुकांची संख्या कमी दिसत आहे.गारगोटीला नगरपरिषद होण्याच्या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे; पण गारगोटी ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार का? की राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ टिकटिक वाजवणार, की आमदार प्रकाश आबिटकर सत्ता पुन्हा अबाधित ठेवणार, हे मात्र निकालानंतर जाहीर होणार आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासकामे चांगल्या प्रकारे केली आहेत; पण गारगोटी मतदारसंघातील लोक कामाची पोचपावती देणार का? पालकमंत्र्यांना राधानगरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे कमळ फुलवायचे आहे. यासाठी राहुल देसाई यांचा भाजप प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गारगोटी येथे शेतकरी मेळावा घेऊन करण्यात आला होता. माजी आमदार बजरंग देसाई यांचा निर्णायक असलेला गट, त्याला भाजपची साथ अशा दुहेरी ताकदीने युवानेते राहुल देसाई हे आघाडीची बांधणी करीत आहेत.

जि. प.च्या निवडणुकीत त्यांनी एकाकी लढत देऊन सौभाग्यवतींना जि. प. सदस्या केले आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील गारगोटी शहरात प्रा. बाळ देसाई, शेखर देसाई, शरद मोरे, सर्जेराव देसाई, विजयराव आबिटकर, अजित देसाई, सुनील बोरवडेकर, आदी मंडळी काम करत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची राजकीय ताकद निर्माण केली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माजी उपसरपंच सयाजी देसाई
यांनी आमदार प्रकाश आबिटकर गटातून फारकत घेऊन जिल्हा परिषदेच्या दोन जागा लढविल्या. त्यांनी दोन मतदारसंघांत सात हजार मताधिक्य घेत दबदबा निर्माण केला आहे.सयाजी देसाई यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Bharadagad front for gram panchayats: Advocates of former MLAs, grandmothers and grandmothers with Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.