मेतकेत भाविकांची मांदियाळी : भंडारा उत्सव -कैताळाच्या निनादात बाळूमामा, हालसिद्धनाथांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:20 PM2019-03-19T23:20:00+5:302019-03-19T23:32:49+5:30

महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील श्री सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथांचा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चिकोत्रा काठावर

Bhandara Festival: Bailamama, Halshikrithnatha Jayne Gosh | मेतकेत भाविकांची मांदियाळी : भंडारा उत्सव -कैताळाच्या निनादात बाळूमामा, हालसिद्धनाथांचा जयघोष

मेतकेत भाविकांची मांदियाळी : भंडारा उत्सव -कैताळाच्या निनादात बाळूमामा, हालसिद्धनाथांचा जयघोष

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारा उत्सव आजही बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा म्हणून भाविक माघ पौर्णिमेला श्रद्धापूर्वक अमाप उत्साहात साजरा करतात.

म्हाकवे : महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील श्री सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथांचा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चिकोत्रा काठावर भंडारा उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी आली होती. गेल्या सात दिवसांपासून सुरू असणाऱ्या या भंडारा उत्सवासाठी सीमाभागातून दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते.

सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं.... श्री हालसिद्धनाथ महाराज की जय...असा अखंड नामघोष ढोल, कैताळाचा निनाद, पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त होत होते. भंडाºयाची उधळण केल्यामुळे मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता, तर अखंड नामघोष व ढोल, कैताळाच्या निनादामुळे चिकोत्रा नदीकाठ दणाणून गेला होता. १९३२ मध्ये सर्व ग्रामस्थ व परिसरातील भाविक यांच्या सहकार्यातून बाळूमामांनी येथील हालसिद्धनाथ देवाचा भंडारा उत्सव सुरू केला. बाळूमामांनी स्वत: जाऊन मेतके परिसरातील चाळीस गावांतील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यामुळे पहिल्याच भंडारा उत्सवाला भाविकांची मांदियाळी उसळली होती. आणि तोच भंडारा उत्सव आजही बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा म्हणून भाविक माघ पौर्णिमेला श्रद्धापूर्वक अमाप उत्साहात साजरा करतात.

भंडारा उत्सवामध्ये काकड आरती, प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भजन व वालंग (ढोल
वादन) यामुळे सात दिवसांपासून या पवित्र चिकोत्रा नदीतीरावर भावभक्तीचा मेळाच जमला
होता. या उत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाथांचे भक्तभगवान डोणे-वाघापुरे यांचे आगमन झाले, तर सायंकाळी सात वाजता गावच्या मुख्य चौकात बिरदेव व बाळूमामा यांच्या पालखीच्या गाठीभेटी झाल्या. तसेच, मिरज, बेडग, टाकळी, मालगाव, उदगाव, शिरोळ, उमळवाड, टोप, पेठवडगाव, घुणकी, म्हाकवे, कुर्ली, हमीदवाडा, मिणचे, सावर्डे, कारदगा, आदी गावांतील वालंगे समाजही दाखल झाला होता. यावेळी पालखी पूजन व देवाचा सबिना, तसेच धनगरी ढोलाचा वालंग व हेडाम खेळण्यात आले.
सोमवारी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायणची सांगता झाली, तर, सकाळी १० वाजता महानैवेद्य होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ५.३० वा. दिंडी सोहळा होऊन भंडारा उत्सवाची सांगता होऊन रात्री उशिरापर्यंत भाविक परतत होते.

श्रद्धेपोटी राबले हजारो हात
मेतके येथील भंडारा उत्सवासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने नेटके नियोजन केले होते. तर सर्व भाविकांना महाप्रसादाचा व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्था, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले. यामुळे हा भंडारा उत्सव सुरळीत पार पडला.

मेतके येथील बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा उत्सवातील प्रमुख असणाºया हेडाम खेळामध्ये भाविक दंग होते. दुसºया छायाचित्रात मंदिरामध्ये ढोल-कैताळ वादन करण्यात आले.

Web Title: Bhandara Festival: Bailamama, Halshikrithnatha Jayne Gosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.