भाजीमंडई, बाजारपेठेत शुकशुकाट; रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:15 AM2019-04-24T01:15:52+5:302019-04-24T01:15:56+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. बहुतांश चौक ...

Bhajmandai, market-wise suspicion; Road dew | भाजीमंडई, बाजारपेठेत शुकशुकाट; रस्ते ओस

भाजीमंडई, बाजारपेठेत शुकशुकाट; रस्ते ओस

Next

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. बहुतांश चौक आणि रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याने ते ओस पडले होते.
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत अत्यंत अटीतटीची लढत होत आहे; त्यामुळे प्रचारदेखील तितकाच चुरशीने झाला. तितकीच चुरस मंगळवारी मतदानावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये दिसून आली. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी शासनाने दिल्याने उपनगर, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरात नोकरी, रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या तुरळक होती. तापमानाचा पारा अधिक असल्याने अनेकांनी दुपारी दोनपूर्वी मतदान करण्याला पसंती दिली. बहुतांश जणांनी मतदान करणे आणि त्यानंतर घरी थांबण्याला प्राधान्य दिले; त्यामुळे मंगळवारी बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, गुजरी परिसर, पापाची तिकटी, गंगावेश, मनपा चौक, बाजारगेट परिसरात शुकशुकाट दिसून आला. अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, महाद्वार रोड, ताराबाई रोड परिसरात बाहेरून आलेले भाविक दिसून आले. बहुतांश व्यावसायिकांनी कामगारांना सुट्टी दिल्याने दुकाने बंद ठेवली. रस्त्यांवर वर्दळ कमी होती. दुपारी दीडनंतर उन्हाचा पारा कमी होईपर्यंत रस्ते, चौक ओस पडले होते. केएमटी निवडणुकीचे साहित्य नेण्यासाठी वापरल्याने त्यांच्या फेºया कमी होत्या. रस्त्यांवर रिक्षांची संख्या कमी दिसली. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर रस्ते, चौकातील वर्दळ हळूहळू वाढू लागली.
सायंकाळनंतर गर्दी
मतदान केल्यानंतर आणि उन्हाचा पारा कमी झाल्याने सायंकाळी साडेसहानंतर अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, पदपथ उद्यानातील गर्दी वाढली. काहींनी मतदान झाल्याने आणि सुट्टी असल्याने चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली.

Web Title: Bhajmandai, market-wise suspicion; Road dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.