शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:13 AM2019-04-22T01:13:57+5:302019-04-22T01:14:02+5:30

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज ...

Always on the road for farmers | शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर

शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर

Next

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शेतकºयांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. मग त्यावेळी सरकार कोणाचेही असो, असा विश्वास व्यक्त करून खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर मीच तोडगा काढणार, असे सांगून मतदारांना भावनिक आवाहन केले.
येथील विक्रमनगरातील बालाजी चौकात प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, वारणा काठावरील शेतकºयांना पाणी कमी पडू न देता इचलकरंजीला पाणी कसे द्यायचे, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे; पण त्यात राजकारण घुसले असल्याने हा प्रश्न विधानसभा निवडणूक होईपर्यंत सुटू दिला जाणार नाही, तरीही इचलकरंजीकरांना मीच पाणी मिळवून देणार आणि त्याबरोबर वस्त्रोद्योगासाठीही सर्वांना एकत्र करून लढा उभारणार. त्यातून यश मिळवून देऊन वस्त्रोद्योगाला बळ देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाआघाडीतील सर्व घटक पक्षांना शेवटच्या टप्प्यावर एकत्रित करून निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामध्ये सर्वांनी दिलेली साथ अमूल्य आहे.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी, करकरेंसारख्या शहीद होणाºया अधिकाºयांविषयी अपशब्द काढणाºया प्रज्ञा सिंहला भाजपने उमेदवारी दिली व मोदी त्यांची पाठराखण करतात. त्यावरूनच मोदी सरकारची दिशा समजते. मोदी शेतकºयांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. मात्र, पुलवामा हल्ल्याच्या नावावर मते मागतात. २०१४ नंतर पठाणकोट, उरी व पुलवामा असे तीन मोठे हल्ले झाले. त्याची नैतिक जबाबदारी समजून एकानेही राजीनामा दिला नाही. त्यातून त्यांचे खुर्चीप्रेम दिसते. भाजपचे लोक व्यक्तिगत टीका करताना दिसतात. त्यांच्याकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
माजी मंत्री प्रकाश आवाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, शेतकरी समन्वय संघटनेचे व्ही. एम. सिंग, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदींची भाषणे झाली. सभेसाठी मदन कारंडे, राजूबाबा आवळे, दिलीप पाटील, अशोक जांभळे, संभाजीराव नाईक, आदींसह घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वस्त्रोद्योगाचे नुकसान
मोदी सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी या फसलेल्या निर्णयांमुळे इचलकरंजीचा वस्त्रोद्योग मोडकळीस आला. त्यांची चुकीची धोरणे सर्वच उद्योगांना उद्ध्वस्त करत आहेत. त्याची जबाबदारी मात्र घेताना त्यांच्यातील कोणीही दिसत नाही.
पदयात्रा व सभेला उत्स्फूर्त गर्दी
इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहापासून निघालेली पदयात्रा मुख्य मार्गांवरून के. एल. मलाबादे चौकात आली. तेथे शेतकºयांनी आसूडाचा आवाज काढत तसेच हलगीच्या तालावर ठेका धरत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यानंतर मुख्य मार्गांवरून फिरून पदयात्रा विक्रमनगरात पोहोचली. तेथे सभेलाही मोठी गर्दी जमली होती.

उद्धव मोदींबरोबर कसे?
निवडणुकांपूर्वी मोदींवर आगपाखड करणारे उद्धव ठाकरे कोणत्या कारणाने मोदींबरोबर गेले, याचे उत्तर आजतागायत कोणाला समजले नाही.
माती, शेतीला जात नसते
माझ्यावर जातीयवादी असल्याची टीका सुरू आहे. दुसरा मुद्दा नसल्याने विरोधकांचे हे काम सुरू आहे. माती व शेतीला जात नसते. त्यामुळे जात बघून मत देण्यापेक्षा काम बघून मत द्या, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

Web Title: Always on the road for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.