आजऱ्याच्या निवडणुकीत ज्याचं त्याचं ‘गणित’-जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:09 AM2018-03-23T01:09:41+5:302018-03-23T01:09:41+5:30

In the Aizawl elections, whose 'mathematics' - the fallacy of the politics of the district is indispensable | आजऱ्याच्या निवडणुकीत ज्याचं त्याचं ‘गणित’-जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद अपरिहार्य

आजऱ्याच्या निवडणुकीत ज्याचं त्याचं ‘गणित’-जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद अपरिहार्य

Next
ठळक मुद्देआगामी लोकसभा, विधानसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीचे संदर्भजिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचे पाठबळ नसले तरी ती डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.

 समीर देशपांडे ।
कोल्हापूर : कोल्हापूरच्या एका टोकाला असलेल्या आजरा नगरपंचायतीसाठीचं धुमशान सुरू झालं असताना जिल्हास्तरीय नेत्यांनी त्यातून आपली ‘गणितं’ जुळवायला सुरुवात केली आहे. याआधी ग्रामपंचायत असताना स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिथलं राजकारण खेळलं गेलं. मात्र, आता जिल्ह्यातील नेत्यांनी आपापल्या पक्षाची चिन्हं रेटायला सुरुवात केली आहे. त्याला आगामी लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकींचे संदर्भ आहेत.

सत्तारूढ भाजप एकीकडे कमळ चिन्हावर ‘ब्रँडेड नगराध्यक्ष’ करण्यासाठी कंबर कसून तयार असताना आजºयाची स्थानिक परिस्थिती त्यांना तशी परवानगी देत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे ‘कमळा’वर पाणी सोडावे लागेल हे पटवून देण्यासाठी भाजप नेते अशोक चराटी यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली; परंतु आजरा नगरपंचायत होण्यामध्ये ‘भाजप’चा सिंहाचा वाटा असल्याने येथील सत्तेसाठी अगदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर हे लढाईच्या अग्रभागी असणार यात शंका नाही.

राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचा हा थेट मतदारसंघ नसला तरीही आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा पराभव करण्यामध्ये अशोक चराटी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. के. पी. पाटील यांच्या पराभवातही चराटी यांचा वाटा होता. जेव्हा मुश्रीफ हे मंत्रिपदावर होते तेव्हापासून त्यांच्याविरोधात चराटी यांनी उघडपणे दंड थोपटल्यामुळे मुश्रीफ यांनीदेखील तुल्यबळ विरोधासाठी या निवडणुकीत पहिल्यापासून लक्ष घातले आहे.

आमदार सतेज पाटील हे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांना आगामी विधान परिषदेसाठीची आजºयाची ही १८ मते महत्त्वाची आहेत. गेली काही वर्षे आजºयातून गायब झालेला ‘हात’ त्यांना पुन्हा चर्चेत आणायचा आहे. त्यामुळे त्यांनीही आजºयात त्यांच्या स्टाईलने बैठक घेतली आणि राष्ट्रवादीची काही मंडळी काँग्रेसमध्ये घेऊन का असेना, परंतु काँग्रेसला लढाईत उतरविले.
आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक चराटी यांनी उघडपणे मदत केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात चराटी यांनी हातात ‘कमळ’ घेतल्याने आबिटकर यांचीही अडचण झाली आहे.

आबिटकर यांच्या विरोधात ‘भाजप’चा तुल्यबळ उमेदवार असणार हे उघड आहे. अशावेळी चराटी यांना भाजपलाच मदत करावी लागणार, तेव्हा आजºयात आपली स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे, हे ओळखून आबिटकर यांनी शेवटच्या टप्प्यात तिसºया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांनी आधी घेतला असता तर ही आघाडी आणखी मजबूत झाली असती. अशा पद्धतीने नेत्यांनी पुढच्या जोडणीसाठी आजºयात राबायला सुरुवात केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा हे मूळ
या निवडणुकीला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मोठी झालर आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पाटील, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक ही फळी एका बाजूला आणि दुसरीकडे हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि संजय मंडलिक हे एका बाजूला, अशी विभागणी झाली आहे. अनेक लहान-मोठ्या नेत्यांना लोकसभेवेळी विधानसभेची गणितं पाहून या दोन्ही गटांपैकी एका गटाचा शिक्का मारून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आजºयाची तालुकास्तरीय नगरपंचायत आपल्या ताब्यात राहावी, यासाठी हे दोन्ही गट तितक्याच ताकदीने उतरणार आहेत, यात शंका नाही. मात्र, तिसºया आघाडीला जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचे पाठबळ नसले तरी ती डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.

लोकसभेसाठी संजय मंडलिक यांच्या पाठीशी आजºयातील ताकद राहावी यासाठी मुश्रीफ, सतेज पाटील प्रयत्नशील राहणार असून, धनंजय महाडिक यांच्यासाठी भाजप आग्रही राहील, अशी विभागणी सध्या तरी दिसत आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीचाच ही निवडणूक म्हणजे एक भाग आहे.

Web Title: In the Aizawl elections, whose 'mathematics' - the fallacy of the politics of the district is indispensable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.