तपासणी करून न घेणाऱ्या स्कूल बसवर आता कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:09 AM2018-05-21T00:09:45+5:302018-05-21T00:09:45+5:30

Action on the school bus without taking the exam | तपासणी करून न घेणाऱ्या स्कूल बसवर आता कारवाई

तपासणी करून न घेणाऱ्या स्कूल बसवर आता कारवाई

googlenewsNext


कोल्हापूर : शहरासह जिल्ह्णातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे स्कूल बसचालक अथवा संस्थांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आपल्या बसेस शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करून घ्याव्यात; अन्यथा अशा बसचालक व संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१० नियमावलीअंतर्गत ‘स्कूल बस नियम व विनियम २०११’प्रमाणे शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना, शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया बसबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार दरवर्षी शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर स्कूल बसची तपासणी केली जाते. सुट्टीचा महिना अर्ध्यावर आला तरी अनेक शाळांमध्ये स्कूल बस सेवा देणारे कंत्राटदार, संस्था यांनी अद्यापही आपल्याकडे असलेल्या स्कूल बसेसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून घेतलेली नाही. त्यामुळे ३१ मेअखेर तपासणी न करून घेणाºया अशा संस्था, व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे.
पालकांचेही दुर्लक्ष नको
स्कूल बसमधून मुलांची सुरक्षितरीत्या ने-आण व्हावी, सुरक्षेचे नियम पाळले जावेत, याकरिता प्रत्येक शाळेत परिवहन समिती नेमणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही अशा प्रकारे शाळांमध्ये समिती नेमलेली नसल्याची बाब नुकत्याच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समोर आली आहे. तरी पालकांनी व संस्थांनी याकडे दुर्लक्ष करू नये, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
स्कूल बसचालकांची या नियमांवर तपासणी
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे, प्रत्येक शाळेची परिवहन समिती नेमणे, वाहनांची कागदपत्रे, जसे नोंदणी प्रमाणपत्र, शालेय बसमध्ये प्रशिक्षित चालक, एक पुरुष व एक महिला परिचर हे पाहणे. सर्व कर्मचारी कंत्राटदाराने दिलेल्या ओळखपत्रांसह स्वच्छ गणवेशात असणे आवश्यक आहे.चालकाला वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्णासाठी दंड झालेला नसावा. वाहतुकीची अनुज्ञाप्ती, बिल्ला असणेही आवश्यक आहे. यासह बसमागे ३९ बाय २३ इंचांची आपत्कालीन खिडकी असणे गरजेचे आहे. हा दरवाजा उघडल्यानंतर दिवा अथवा घंटा वाजण्याची यंत्रणा बसमध्ये आवश्यक आहे. वाहनाचा वेग ४० किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक नसावा. स्कूल बसमध्ये या सर्व बाबी अंतर्भूत आहेत की नाहीत, याची तपासणी केली जाते.

Web Title: Action on the school bus without taking the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.