७२ वर्षीय ‘तरुणा’ची बारावी होण्याची जिद्द-: नाईट कॉलेजचे विद्यार्थी; तीन विषयांत झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:16 AM2019-05-29T01:16:39+5:302019-05-29T01:17:17+5:30

लक्ष्मीपुरी येथील रवींद्र बापू देशिंगे यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. परीक्षेतील सहापैकी तीन विषयांमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. जुलै-आॅगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेत उर्वरित विषय सोडवून बारावी उत्तीर्ण होण्याचा निर्धार

72-year-old 'youth' sticks to the 12th: Night college students; Three subjects were passed | ७२ वर्षीय ‘तरुणा’ची बारावी होण्याची जिद्द-: नाईट कॉलेजचे विद्यार्थी; तीन विषयांत झाले पास

७२ वर्षीय ‘तरुणा’ची बारावी होण्याची जिद्द-: नाईट कॉलेजचे विद्यार्थी; तीन विषयांत झाले पास

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मीपुरीतील रवींद्र देशिंगे

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील रवींद्र बापू देशिंगे यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. परीक्षेतील सहापैकी तीन विषयांमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. जुलै-आॅगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेत उर्वरित विषय सोडवून बारावी उत्तीर्ण होण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

देशिंगे यांचा आॅगस्ट १९४७ चा जन्म. सन १९६३ मध्ये ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी दोन वर्षांचा आॅटोमोबाईल डिप्लोमा केला. या शिक्षणानंतर त्यांनी जर्मन बनावटीच्या दुचाकी दुरूस्ती, सुटे भाग विक्रीचे काम सुरू केले. या दुचाकीचे प्रमाण कमी झाल्याने हा व्यवसाय काही थंडावल्याने त्यांनी बांधकामातील प्लास्टरसाठी वापरल्या जाणाºया पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांची नात प्राची ही इंजिनिअर झाली. तिच्या यशातून प्रेरणा घेत देशिंगे यांनी अकरावी आणि बारावी पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी सन २०१७ मध्ये कोल्हापुरातील नाईट कॉलेजमध्ये अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. यावर्षी बारावीमधील तीन विषयांमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागातील सर्वांत वयस्कर विद्यार्थी ते आहेत. त्यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात येऊन निकाल जाणून घेतला.

मोबाईलपासून तरुणांनी दूर राहावे
वर्गातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करून अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात तीन विषयांत उत्तीर्ण झालो आहे. उर्वरित विषय येणाºया परीक्षेत सोडविणार आहे. शिक्षण घेणाºया तरुणांनी मोबाईलपासून दूर राहावे, असे आवाहन देशिंगे यांनी केले.
 

लक्ष्मीपुरीतील ७२ वर्षीय रवींद्र देशिंगे यांना विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश आवारी यांनी निकालाची इंटरनेट प्रत देत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शेजारी
एस. एल. रेणके.

Web Title: 72-year-old 'youth' sticks to the 12th: Night college students; Three subjects were passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.