कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर ट्रॅक्स उलटल्याने अपघात, 15 मुलं जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 11:29 AM2019-01-05T11:29:55+5:302019-01-05T11:44:15+5:30

कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर शनिवारी (5 जानेवारी) ट्रॅक्स उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 15 मुलं जखमी झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

15 students injured in road accident in Panhala road in Kolhapur | कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर ट्रॅक्स उलटल्याने अपघात, 15 मुलं जखमी

कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर ट्रॅक्स उलटल्याने अपघात, 15 मुलं जखमी

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर शनिवारी (5 जानेवारी) ट्रॅक्स उलटल्याने अपघात झाला आहे.अपघातात 15 मुलं जखमी झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोल्हापूर - कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर शनिवारी (5 जानेवारी) ट्रॅक्स उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 15 मुलं जखमी झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. गाडीतील सर्व मुलं मर्दानी खेळ खेळण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रूझरमधून 11 ते 14 वयोगटातील मुलं प्रवास करत होती. त्याच दरम्यान केरली परिसरात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात 15 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: 15 students injured in road accident in Panhala road in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.