साखर मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:48 AM2019-02-20T00:48:18+5:302019-02-20T00:48:22+5:30

कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची ...

100 per cent increase in sugar valuation | साखर मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ

साखर मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ

Next

कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ झाली असून, १२.५ टक्के उताऱ्याला ३२९३ रुपये उचल मिळणार आहे. मिळणारी उचल, उपपदार्थांच्या पैशांमुळे कारखानदारांना एफआरपी देण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला असला, तरी एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची दमछाकच होणार आहे.
यंदा हंगाम सुरू झाल्यापासून दरात २८ रुपयांपर्यंत घसरण झाल्याने केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल २९०० रुपये केला. त्यानंतर साखरेचे दर ३००० रुपयांवर स्थिरावले. बॅँकांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन, मूल्यांकनानुसार प्रतिक्विंटल ३००० हजार रुपये कारखान्यांना पैसे दिले. मूल्यांकनाच्या ८५ टक्केप्रमाणे २५५० रुपये प्रतिक्विंटल कारखान्यांना मिळत होते. त्यातून ऊसतोडणी-वाहतूक, प्रक्रिया खर्च व बॅँकांची देणी दिल्यानंतर उसासाठी १८०० ते १९०० रुपयेच हातात राहत होते; त्यामुळे एकरकमी एफआरपी न देता, प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे कारखान्यांनी शेतकºयांना पैसे दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला विरोध केला. त्यात केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० वरून ३१०० रुपये केला. बाजारात साखरेचे दर झटक्यात वाढल्याने बॅँकांनी मूल्यांकनातही वाढ केली आहे.
राज्य बॅँकेने मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सरासरी १२.५ टक्के उतारा असणाºया कारखान्याला बॅँकेकडून ३२९३ रुपये मिळतील. त्याशिवाय मोलॅसिस, बगॅस, डिस्टिलरीतून सरासरी ४५० रुपये उपलब्ध होऊ शकतात; त्यामुळे कारखान्यांच्या हातात प्रतिटन ३७४३ रुपये मिळतील. त्यातून ऊस तोडणी-ओढणी, प्रक्रिया खर्च व बॅँकांचे हप्ते असे सरासरी १०५० रुपये वजा जाता, २६९३ रुपये एफआरपीसाठी राहू शकतात; पण हे तयार झालेल्या सगळ्या साखरेचा प्रतिक्विंटल ३१०० रुपयांनी हिशेब केला. यातून निर्यात साखरेच्या दरातील तफावत व सभासदांना दिल्या जाणाºया सवलतीच्या साखरेचा हिशेब करावा लागणार आहे. हा फटका टनाला सरासरी १०० ते १५० रुपये बसू शकतो; त्यामुळे मूल्यांकनात १00 रुपयांची वाढ झाली, तरीही एकरकमी एफआरपी देताना कारखान्यांची दमछाक होणारच आहे.
कर्जातील
कारखाने खाईतच
साखरेच्या किमान दरात वाढ झाली असली, तरी यातून कारखानदारी पूर्णत: बाहेर येईल, असे वाटत नाही. हंगामात अनेक कारखान्यांकडे कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. बिगर हंगामात तर पगारच होणार नाहीत, अशी अनेक कारखान्यांची परिस्थिती आहे. भरमसाट कर्ज असणारे कारखाने खाईत लोटण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाढीव मूल्यांकनानुसार उपलब्ध रक्कम - २६३५ रुपये प्रतिक्विंटल
१२.५ टक्के उताºयासाठी मिळणारी रक्कम - ३२९३ रुपये
मोलॅसिस, बगॅस, डिस्टलरीचे उत्पन्न - ४५० रुपये
तोडणी, प्रक्रिया खर्च, बॅँक हप्ते - १०५० रुपये
निव्वळ उसासाठी शिल्लक रक्कम - २६९३ रुपये

Web Title: 100 per cent increase in sugar valuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.