आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

By अनिकेत घमंडी | Published: March 12, 2024 11:25 AM2024-03-12T11:25:59+5:302024-03-12T11:26:21+5:30

मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Railway track crack on Asangaon Wasind line | आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

डोंबिवली:वासींद-आसनगाव दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची  घटना सकाळी ०९:०५ च्या सुमारास घडली. त्यामुळे १०:०३ मिनिटांची लोकल अनिश्चित काळाने सोडण्यात येणार असल्याची माहिती कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी दिली.

मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सकाळपासून कर्जत मार्गावर देखील लोकल विलंबाने सुटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कसारा कर्जत दोन्ही दिशांवरचे वेळापत्रक कोलमडले आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपक्रमाद्वारे काही रेल्वे प्रकल्पांचा उदघाटन सोहळयाची धावपळ असतानाच हा घोळ।झाल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ।उडाली.
लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दहावी शालांत परीक्षा सुरू असून त्यात ही घटना घडल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे विशे म्हणाले.

Web Title: Railway track crack on Asangaon Wasind line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.