भारताच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By अनिकेत घमंडी | Published: February 24, 2024 08:34 PM2024-02-24T20:34:43+5:302024-02-24T20:35:34+5:30

कल्याणजवळील खासगी शिक्षण संस्थेच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन 

radical changes in india education sector in last ten years said union finance minister nirmala sitharaman | भारताच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

भारताच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अनिकेत घमंडी, कल्याण: भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारकडून अतिशय भरीव असे काम करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. कल्याणजवळील कांबा येथे एका शिक्षण संस्थेच्या मुंबई कॅम्पसचे अर्थमंत्री सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

२०१४ मध्ये देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून दरवर्षी एक नवीन आयआयटी, आयआयएम उघडले जात आहे, भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ बांधले जात आहे, दर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उघडली जाते - प्रत्येक दुसऱ्या दिवशी एक नवीन महाविद्यालय बांधले जात आहे, दररोज एक नवीन आयटीआय तयार होत आहे आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत आतापर्यंत १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची आकडेवारी त्यांनी यावेळी जाहीर केली. या सर्व बाबींचा विचार करता भारतात शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकार किती मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच या सर्वांची केवळ घोषणा करून सरकार थांबत नाहीये तर अर्थसंकल्पातही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची खबरदारीही सरकार घेत असल्याचे त्यांनी त्यावेळी अधोरेखित केले.

त्यासोबतच केंद्र सरकार विविध देशांसोबत शैक्षणिक पात्रता फ्रेमवर्कच्या आखणीसाठीही सक्रीय पाठबळ देत असून त्यामूळे सामंजस्य कराराद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात घेणे शक्य होईल. आम्ही अलीकडच्या काळात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि यूएई या देशांसह अनेक द्विपक्षीय सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षरी केली आहे. आणि इतर अनेक देशही या वाटाघाटी प्रक्रियेत असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, पद्यभूषण राजश्री बिर्ला, नीरजा बिर्ला यांचीही उपस्थिती होती. -

Web Title: radical changes in india education sector in last ten years said union finance minister nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.