VIDEO: चोरानं बेल्टच्या सहाय्यानं 10 सेकंदात तोडलं लॉकअपचं कुलूप, कलाकारी पाहून पोलीसही चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:15 PM2024-02-05T18:15:17+5:302024-02-05T18:16:02+5:30

या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

VIDEO: The thief broke the lockup lock in 10 seconds with the help of Belton, the police were also shocked to see the artistry viral videoa | VIDEO: चोरानं बेल्टच्या सहाय्यानं 10 सेकंदात तोडलं लॉकअपचं कुलूप, कलाकारी पाहून पोलीसही चक्रावले!

VIDEO: चोरानं बेल्टच्या सहाय्यानं 10 सेकंदात तोडलं लॉकअपचं कुलूप, कलाकारी पाहून पोलीसही चक्रावले!

सध्या सोशल मीडियावर एका गुन्हेगाराचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्यासमोरच लॉकअपचे कुलूप तोडून त्यांना चकित केले. महत्वाचे म्हणजे, हे कुलूप तोडण्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारच्या साधनांचा वापर केला नाही, तर केवळ कमरेला लावायच्या बेल्टच्या सहाय्याने त्याने हे कुलूप तोडले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

'आवश्यकताच आविष्काराची जननी'! -
हा व्हिडिओ X हॅन्डल @HumansNoContext ने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित कैदी पोलीस अधिकाऱ्यांना लॉकअपचे कुलूप तोडून दाखवत आहे. या व्हडिओला आतापर्यंत तब्बल 40 हजार लाइक्स, 20.2 मिलियन व्ह्यूज आणि शेकडो कमेन्ट्स आल्या आहेत. यासंदर्भात एका व्यक्तीने लिहिले आहे, कमरेला लावायच्या बेल्टचा असा वापर पहिल्यांदाच बघितला. तर आवश्यकताच आविष्काराची जननी आहे, असे काही यूजर म्हणत आहेत. 

बेल्टच्या मदतीने तोडले लॉकअपचे कुलूप -
केवळ 1.08 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की, एक व्यक्ती त्यावर पायाने उभा राहतो. यामुळे कुलूप तुटते. हे पाहून पोलीस अधिकारीही थक्क होतात. एक व्यक्ती लॉकअपमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पोलीस उभे आहेत. संबंधित व्यक्ती लॉकअपचे कुलूप कसे तोडता येते हे प्रॅक्टिकली सांगत आहे. यासाठी तो आपला कापडाचा बेल्ट काढून लॉकअपच्या ग्रीलमधून बाहेर काढतो आणि लॉकमध्ये अडकतो. यानंतर, बेल्टला एक गाठ मारतो आणि त्यात पाय ठेवऊन उभा राहतो. यामुळे कुलूप तुटते. हे पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून जातात.

पाहा व्हिडिओ -

Web Title: VIDEO: The thief broke the lockup lock in 10 seconds with the help of Belton, the police were also shocked to see the artistry viral videoa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.