टीपू सुलतानच्या बंदुकीचा आणि तलवारीचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:46 PM2019-03-28T14:46:02+5:302019-03-28T14:51:03+5:30

ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची काही शस्त्रे सापडली होती. या वस्तूंचा लिलाव करण्याक आला आहे.

Sword and gun of Tipu sultan auctioned in UK | टीपू सुलतानच्या बंदुकीचा आणि तलवारीचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत!

टीपू सुलतानच्या बंदुकीचा आणि तलवारीचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत!

Next

ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची काही शस्त्रे सापडली होती. या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. या परिवाराचे पूर्वज मेजर थॉमस हार्ट, ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत एक सेना अधिकारी होते. १७९८ ते ९९ मध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या अ‍ॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर काही कलाकृती आणि हत्यारे घरी घेऊन आले होते. त्यातीलच हे शस्त्रे आहेत.

टीपू सुलतानच्या वस्तूंचा Berkshire मध्ये तब्बल 107,000 पाऊंड मध्ये लिलाव करण्यात आला. यात टीपू सुलतानच्या 'Silver-Mounted 2--Bore Flintlock Gun आणि Bayonet' वर १४ बोली लागल्या. शेवटी या वस्तू ६०,००० पाऊंड(जवळपास ५४,५५,८२९ रुपये) मध्ये विकल्या गेल्या.

टीपू सुलतानच्या वडिलांची सोन्याची मूठ असलेली तलवार आणि Suspension Belt वर ५८ बोली लावण्यात आल्या होत्या. या वस्तू १८,५०० पाऊंड (लगभग १६,८३,२३१.०९) ला विकल्या गेल्या. 

शस्त्रांसोबतच यात एका छोट्या संदूकाचाही लिलाव करण्यात आला. याला १७,५०० पाऊंड (जवळपास १५,९३,६८१.२५ रुपये) इतकी किंमत मिळाली. पण भारताने यातील एकाही वस्तूची खरेदी केली नाही. 

लंडन येथील भारतीय हाय कमीशनला  India Pride Project प्रोजेक्टने या लिलावाची माहिती दिली होती. तर जगभरातील Volunteers ने लिलावातील वस्तूंची खरेदी करण्याची मागणी केली होती. Auction House ने लिलावाबाबत सांगितले की, ते कोणताही नियम तोडत नाहीयेत. आणि ज्या परिवारांना यातून पैसा मिळेल ते भारतातील एका शाळेला काही रक्कम दानही करणार आहेत.

Web Title: Sword and gun of Tipu sultan auctioned in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.