आई एअरपोर्टवर मुलाला विसरून विमानात बसली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:02 PM2019-03-12T17:02:01+5:302019-03-12T17:04:21+5:30

एक महिला तिच्या मुलाला टर्मिनलच्या वेटिंग रूम एरियामध्येट विसरून आली होती.

Saudia passenger jet sv 832 turns around after mother forgets her baby at Aitport | आई एअरपोर्टवर मुलाला विसरून विमानात बसली आणि....

आई एअरपोर्टवर मुलाला विसरून विमानात बसली आणि....

googlenewsNext

ही घटना सौदी अरबची आहे. एका पॅसेंजर प्लेनला प्रवास अर्धवट सोडून परत एअरपोर्टला यावं लागलं. कारण एक महिला तिच्या मुलाला टर्मिनलच्या वेटिंग रूम एरियामध्येट विसरून आली होती. धक्कादायक बाब म्हणजे आपला मुलगा सोबत नाही हे प्लेनने उड्डाण घेतल्यावर या महिलेच्या लक्षात आलं. 

रिपोर्ट्सनुसार, Saudi एअरलाइन्सची फ्लाइट SV 832 जेद्दाहून मलेशियातील क्लालालंपूर येथे जात होती. विमानाने उड्डाण घेतल्यावर काही वेळानेच एक महिला विमानातील क्रूजवळ पोहोचली. महिला फारचा घाबरलेली होती. तिने सांगितले की, ती तिच्या मुलाला एअरपोर्ट टर्मिनलवरच विसरून आली आहे. विमानाच्या क्रू ने तात्काळ पायलटशी संपंर्क केला. त्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. 

महिला मुलाला किंग अब्दुल अजील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या डिपार्चर लाउंजमध्येच विसरून आली होती. याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमचे अधिकारी बोलत आहेत. यात पायलटच्या आवाजासोबतच त्या महिलेचा देखील आवाज येत आहे. 

फ्लाइट नंबर कन्फर्म केल्यावर कंट्रोल रूममध्ये असलेल्या ऑपरेटरने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याशी प्रोटोकॉलबाबत चर्चा केली. महिलेने पुढे प्रवास करण्यास नकार दिला होता. तसं ऑपरेटर्सना सांगण्यात आलं होतं.  त्यामुळे विमान परत बोलवण्यात आलं. त्यानंतर आई आणि मुलाची भेट कशी झाली याबाबत काही माहिती मिळाली नाही. आशा आहे की, दोघेही ठीक आणि सोबत असतील. 

Web Title: Saudia passenger jet sv 832 turns around after mother forgets her baby at Aitport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.