पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:57 PM2022-02-16T14:57:30+5:302022-02-16T14:57:46+5:30

आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे.

salute to Nagpur Police creativity shares memes for awareness of cyber crime inspired by Pushpa Movie | पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

Next

पुष्पा चित्रपटातील अनेक डॉयलॉग लोकांना प्रचंड आवडत आहेत. पण असा एक डायलॉग आहे, जो लोकांच्या ओठ्यांवर जास्त आहे. आता थेट ऑनलाइन फसवणुकीबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगचा वापर केला आहे. आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. अल्लू अर्जुनच्या या व्हायरल डायलॉगचा वापर करून नागपूर पोलिसांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या क्लिक ओपन करू नका असा संदेश लोकांना दिला आहे.

नागपूर पोलिसांच्या या क्रिएटिव्हचे सोशल मीडियावर काैतुक केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, ‘नागपूर पोलिसांचे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला फॉलोअर समजले का? आग आहे..! दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘खरोखर लोकांना पटवण्याचा हा सर्वोत्तम आणि सर्वात चांगला मार्ग आहे. ‘आणखी एका युजरने लिहिले की, मला नागपूर पोलिसांची ही खास शैली खूप प्रचंड आवडली आहे. याशिवाय अनेकांनी ही पोस्ट पाहिली आणि नागपूर पोलिसांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.

Web Title: salute to Nagpur Police creativity shares memes for awareness of cyber crime inspired by Pushpa Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.