वाचा सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डविषयी माहित नसलेल्या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:48 PM2017-10-06T17:48:37+5:302017-10-06T18:51:29+5:30

अनेक सेलिब्रिटींसह त्यांचे बॉडीगार्डसुध्दा माध्यमांमध्ये त्यांच्या कृत्यामुळे चर्चेचा विषय ठरलेले असतात.

Read things that you do not know about celebrities bodyguards | वाचा सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डविषयी माहित नसलेल्या गोष्टी

वाचा सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डविषयी माहित नसलेल्या गोष्टी

ठळक मुद्देकधी कधी सेलिब्रिटींजचे संरक्षण करताना आम्हाला बेकायदेशीर कामेही करावी लागतात. सेलिब्रिटींच्या मागे-पुढे चालणारे, सतत त्यांच्या सोबत असणारे बॉडीगार्ड्स आपल्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय असतात.मनोरंजन विश्वाशी जोडलं गेल्यानंतर काहीच ठरवून असं करता येत नाही. कधी कधी अचानक परदेशी जावं लागतं.

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा रक्षकांची गरज असते. अनेक सेलिब्रिटींसोबत आपण बॉडीगार्ड पाहतो. सलमान खान त्याच्यासोबत कायम भरपूर बॉडीगार्ड घेऊन फिरताना दिसतो. अनेक सेलिब्रिटींसह त्यांचे बॉडीगार्डसुध्दा माध्यमांमध्ये त्यांच्या कृत्यामुळे चर्चेचा विषय ठरलेले असतात. सेलिब्रिटींच्या मागे-पुढे चालणारे, सतत त्यांच्या सोबत असणारे बॉडीगार्ड्स आपल्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय असतात. पण त्यांच्याविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. खरंतर प्रत्येक क्षेत्राप्रमाणे इकडेही स्ट्रगल आहेच. त्या स्टार्सच्या फॅन्सना सांभाळताना अनेकवेळा त्यांना अपमान सहन करावा लागतो. प्रसंगी आपल्या ठरवलेल्या कामांव्यतिरिक्त कामही करावं लागतं. सेलिब्रिटी नक्की आपल्या बॉडिगार्डला कसं वागवतात याची जबानी प्रत्यक्ष बॉडीगार्डनची जुबानी-

१. आपलं काम जर एखाद्या सेलिबब्रिटीला आवडलं असेल तर ते इतरांना आपल्या कामाबद्दल सुचवतात. मग आपली इच्छा नसतानाही इतर सेलिब्रिटींसोबतही काम करावं लागतं. या क्षेत्रात तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण या गोष्टींकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामातूनच इतरांना खुश ठेवावं लागतं पण काम मिळावं म्हणून नावडणाऱ्या व्यक्तींच्याही मागेपुढे करावं लागतं.

२. या क्षेत्रात तुम्हाला स्वतःचं आयुष्य अजिबात उरत नाही. सेलिब्रिटींच्या वेळेनुसार, त्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमानुसारच स्वत:च शेड्युल्ड तयार करावं लागतं. ते जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, त्यांच्या टेबलवर बसून एकत्र जेवायचं नाही असे अलिखित नियम असतात. एखाद्या कार्यक्रमाला किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर सामान्य माणसांसारखंच वागायचं, सतत त्यांच्यासोबतच राहायचं आणि नोकराप्रमाणे त्यांना काय हवं नको पाहायचं, अशा अनेक अपेक्षा सेलिब्रिटींकडून केल्या जातात. 

३. मनोरंजन विश्वाशी जोडलं गेल्यानंतर काहीच ठरवून असं करता येत नाही. कधी कधी अचानक परदेशी जाण्याचे योग येतात. तेव्हा आपल्याला कुटूंबासोबत ठरलेले सगळे प्लॅन्स रद्द करून त्यांच्यासोबत परदेशवारी करावी लागते. यामध्ये एक गोष्ट फार आनंदाची असते की त्यांच्यामुळे संपूर्ण जग, वेगवेगळे देश फिरायला मिळतात आणि वेळ मिळालाच तर या सफरीचा आनंदही लुटता येतो.

४. काही सेलिब्रिटी फार विक्षिप्त असतात. त्यांच्या कामाच्या वेळात किंवा त्यांच्या स्वभावामुळे ते अनेक गोष्टी विसरतात. अगदी त्यांनाही फॅमिली आहे ,संसार आहे, त्यांचा वाढदिवस या साऱ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून द्याव्या लागतात. कधी कधी या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्यावरही अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांशी नेमकं कसं वागावं हाच मोठा प्रश्न पडतो.

५. जर बरीच वर्ष एखाद्या सेलिब्रिटीसोबत काम केलं तर ते प्रत्येक गोष्टीसाठी ग्राह्य धरतात. अगदी त्यांच्या मित्रांची मुलं सांभाळण्यापासून ते त्यांच्या कुत्र्याला गार्डनमध्ये फिरवून आणण्यापर्यंत साऱ्या गोष्टी ते बॉडीगार्ड्सकडून अपेक्षित करत असतात.

६. या क्षेत्रात बॉडीगार्डचं काम फक्त मालकाचं शरीर संरक्षण करणं एवढंच नसतं, तर त्यांची जर एखाद्या ठिकाणी इतर गोष्टींमुळे नाचक्की होत असेल तर त्या गोष्टीसाठीही त्यांचं संरक्षण करावं लागतं. शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींसाठी त्यांचं संरक्षण करणं भाग असतं.

७. कधी कधी सेलिब्रिटींजचे संरक्षण करताना आम्हाला बेकायदेशीर कामेही करावी लागतात. गर्दी पांगवण्यासाठी लोकांवर हात उगारावा लागतो. मग त्यांच्यावर माध्यमातून टीका केली जाते. 

८. मनोरंजन क्षेत्रात नव्याने येत असलेल्या सेलिब्रिटी हे जुन्या सेलिब्रिटींसारख्याच चुका करत असतात. माध्यमात सतत चर्चेत राहण्यासाठी ते काही ना काही शोधत असतात. अनपेक्षितपणे त्याचा फटका यांना बसत असतो.

९. सोशल मीडियामुळे अनेक चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींशी संपर्क साधता येतो. त्यामुळेही अनेक प्रसंग उद्भवतात. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावरील हॅन्डल्सवरही लक्ष द्यावं लागतं.

१०. काही सेलिब्रिटी मनाने फार चांगले असले तरी कामाच्या ताणामुळे त्यांचं मानसिक संतुलन अनेकवेळा बिघडतं. त्यातून बॉडीगार्ड सेलिब्रिटींच्या जवळचे असल्याने त्याचा रागही निघत असतो. त्यामुळे या क्षेत्रात येताना सगळ्याच गोष्टींशी जुळवून घ्यावं लागेल हा विचार पक्का करूनच यावं. 

Web Title: Read things that you do not know about celebrities bodyguards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.