पाहावं ते नवल ! काजूच्या झा़डावरील एका घोसावर लागले तब्बल 50 काजू

By balkrishna.parab | Published: March 30, 2018 03:07 PM2018-03-30T15:07:50+5:302018-03-30T15:29:38+5:30

एकाच जास्वंदीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलल्याचे. दोन तोंडाचा साप सापडल्याचेही ऐकले असेल. कोकणात गेला असाल भरघोस काजूंनी भरलेली काजूची झाडंही तुम्ही पाहिलचं असेल. पण एका काजूच्या घोसाला जास्तीत जास्त किती काजू लागू शकतात.

OMG! 50 cashew nuts | पाहावं ते नवल ! काजूच्या झा़डावरील एका घोसावर लागले तब्बल 50 काजू

पाहावं ते नवल ! काजूच्या झा़डावरील एका घोसावर लागले तब्बल 50 काजू

Next

सिंधुदुर्ग - या जगात घडत असलेल्या चमत्कारांविषयी तुम्ही ऐकलं असेल. कधी एकाच जास्वंदीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलल्याचे. दोन तोंडाचा साप सापडल्याचेही ऐकले असेल. कोकणात गेला असाल भरघोस काजूंनी भरलेली काजूची झाडंही तुम्ही पाहिलचं असेल. पण एका काजूच्या घोसाला जास्तीत जास्त किती काजू लागू शकतात. तीन, चार, पाच, जास्तीत जास्त, दहा. पण एका घोसाला तब्बल 50 हून अधिक काजू लागल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे.   

हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील आहे. येथील शेतकरी संतोष शेटकर यांच्या शेतातील काजूच्या झाडावरील एका घोसाला तब्बल 50 हून अधिक काजू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोकणात काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ते काजू काढण्यासाठी गेले असता आपल्या शेतातील एका काजूच्या झाडावर एकाच घोसाला तब्बल 56 काजू लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घोसाची छायाचित्रे काढून आपल्या मित्रमंडळींना पाठवली आणि बघता बघता हा प्रकार पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला. 


काजूच्या झाडावरील एका घोसाला जास्तीत जास्त दहापर्यंत काजू लागू शकतात. मात्र हा प्रकार चमत्कारिक आहेत, अशी प्रतिक्रिया गावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच या काजूंचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Web Title: OMG! 50 cashew nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.