ईशान्य भारतातील पाण्यावर तरंगणारी घरे, जादुई दुनियेत आल्याचा भास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 03:33 AM2017-08-25T03:33:35+5:302017-08-25T03:33:40+5:30

ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यातील लोकटक सरोवराचे हे दृश्य पाहून डोळ्यांचे पारणेच फिटते. एखाद्या जादुई दुनियेत आल्याचा भास होतो.

Houses floating on water in northeast India, in the magical world | ईशान्य भारतातील पाण्यावर तरंगणारी घरे, जादुई दुनियेत आल्याचा भास

ईशान्य भारतातील पाण्यावर तरंगणारी घरे, जादुई दुनियेत आल्याचा भास

googlenewsNext

- ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यातील लोकटक सरोवराचे हे दृश्य पाहून डोळ्यांचे पारणेच फिटते. एखाद्या जादुई दुनियेत आल्याचा भास होतो. राजधानी इंफाळपासून ४५ किलामीटर दूर असलेले हे सरोवर या भागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
या सरोवरात काही भागात गवत आणि अन्य वनस्पती दिसून येतात. त्यावर तरंगणारी छोटी छोटी घरेही दिसतात. या सरोवरामध्ये २३३ प्रकारच्या वनस्पती, १०० हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि ४२५ प्रकारचे वन्यप्राणी दिसून येतात.
या भागात मच्छीमारांची संख्या खूप मोठी आहे. पाण्यावर तरंगणारे वनस्पतींचे हे टापू आणि त्यावरील छोटी घरे नदीच्या प्रवाहासोबत आपली स्थाने बदलतात. ईशान्य भारतातील आणि त्यातही मणिपुरातील निसर्गसौंदर्य पाहू इच्छिणाºयांनी या सरोवराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

Web Title: Houses floating on water in northeast India, in the magical world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.