Gujarat News: जीवदान! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला 47 किलो वजनी ट्यूमर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:33 PM2022-02-16T12:33:18+5:302022-02-16T12:33:26+5:30

Gujarat News: गुजरातमधील 56 वर्षीय महिलेच्या पोटात हे ट्यूमर होते. मागील 18 वर्षांपासून तिला या ट्यूमरचा त्रास होता.

Gujarat News: Doctors removed a 47 kg tumor from the woman's abdomen in Gujarat | Gujarat News: जीवदान! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला 47 किलो वजनी ट्यूमर

Gujarat News: जीवदान! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला 47 किलो वजनी ट्यूमर

Next

अहमदाबाद:गुजरातमधीलडॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये डॉक्टरांनी महिलेला महिलेच्या पोटातून 47 किलो वजनाची गाठ(ट्यूमर) काढून महिलेला जीवदान दिले. ट्यूमरमुळे महिलेला गेल्या 18 वर्षांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. महिलेचे वजनही दुप्पट झाले होते, आता ट्यूमर काढल्यानंतर महिलेचे वजन केवळ 49 किलो राहिले आहे.

ट्यूमरचे वजन 47 किलो आहे
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील 56 वर्षीय महिलेला गेल्या 18 वर्षांपासून ट्यूमर होता. त्या महिलेचे वजन 49 किलो तर ट्यूमरचे वजन  47 किलो होते. डॉक्टरांनी मोठ ऑपरेशन करुन तिच्या पोटातून हे ट्यूमर बाहेर काढले. सध्या महिलेची प्रकृती ठीक असून, लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. 

ट्यूमर 2004 मध्ये आढळला 
अपोलो हॉस्पिटलचे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. चिराग देसाई म्हणाले की, रुग्णाला सरळ उभे राहता येत नसल्याने आम्ही शस्त्रक्रियेपूर्वी तिचे वजन करू शकलो नाही. मात्र ऑपरेशननंतर तिचे वजन 49 किलो झाले. महिलेच्या कुटुंबीयांना वाटले की कदाचित हे गॅस्ट्रिकचा त्रास आहे, त्यांनी प्रथम काही आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक औषधे घेतली. त्यानंतर 2004 मध्ये सोनोग्राफी केली असता ती सौम्य गाठ असल्याचे समोर आले.

टीमचा भाग असलेले ऑन्को-सर्जन नितीन सिंघल म्हणाले की, प्रजननक्षम वयोगटातील अनेक महिलांमध्ये फायब्रॉइड्स सामान्य असतात, परंतु क्वचितच ते इतके मोठे होतात. भूलतज्ज्ञ अंकित चौहान, जनरल सर्जन स्वाती उपाध्याय आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट जय कोठारी यांचा या शस्त्रक्रियेत सहभाग होता.

Web Title: Gujarat News: Doctors removed a 47 kg tumor from the woman's abdomen in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.