बघा कसं होतं जगातलं पहिलं घड्याळ, हे घड्याळ बघून व्हाल चकीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:42 PM2018-07-17T13:42:35+5:302018-07-17T13:46:41+5:30

जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं? हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर आज आम्ही तुम्हाला जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं हे दाखवणार आहोत. 

Is This is the first watch in the world invented by Peter Henlein? | बघा कसं होतं जगातलं पहिलं घड्याळ, हे घड्याळ बघून व्हाल चकीत!

बघा कसं होतं जगातलं पहिलं घड्याळ, हे घड्याळ बघून व्हाल चकीत!

googlenewsNext

आता घड्याळीचं महत्व फारच वाढलं आहे. प्रत्येकजण या घड्याळाच्या काट्यानुसार धावतो आहे. सोबतच घड्याळ एक फॅशनचाही भाग झालं आहे. पण जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं? हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर आज आम्ही तुम्हाला जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं हे दाखवणार आहोत. 

वरील चित्रात दिसत असलेली घड्याळ हे जगातलं पहिलं घड्याळ मानली जात आहे. जगातला सर्वात पहिलं घड्याळ निर्मित करणारा व्यक्ती म्हणून पीटर हॅनलॅनचं नाव घेतलं जातं. आणि आता याच पीटर हॅनलॅनची एक घड्याळ मिळाली आहे. या घड्याळाला पोमॅंडर हे नाव देण्यात आलंय. या घड्याळाला जगातलं पहिलं घड्याळ म्हणून मान्यता मिळत आहे. 

जगातल्या जुन्या घड्याळांचं मुल्यांकन करत असलेल्या एका कमिटीने सांगितले की, सफरचंदाच्या आकाराची हे पोमॅडर घड्याळ जगातलं सर्वात जुनं घड्याळ आहे. या कमिटीमध्ये हरमॅन ग्राएब, डॉ.पीटर मिलिकिसन यांसारखे संशोधक आहे. 

हे घड्याळ जगासमोर येण्याचीही एक मजेदार कहाणी आहे. घड्याळ तयार करणाऱ्या एका तरूणाने लंडनच्या एका जुन्या वस्तूंच्या मार्केटमधून १० पाऊंडमध्ये एक बॉक्स विकत घेतला होता. त्याच बॉक्समध्ये हे घड्याळ मिळालं. त्याने २००२ मध्ये हे घड्याळ विकलं आणि ते घेणाऱ्याने आणखी कुणालातरी विकली. पुढे जाऊन ही घड्याळ एका संशोधकाने खरेदी केलं आणि त्याने या घड्याळाला ओळख दिली. 

हे घड्याळ सोनं आणि कॉपरपासून तयार करण्यात आलं आहे. १५०५ मध्ये हे घड्याळ तयार करण्यात आलं होतं. हे घड्याळ पीटर हॅनलॅन यांची असल्याचं सांगितलं जात आहे. तर या घड्याळाची किंमत ३० ते ५० मिलियन यूरो इतकी असल्याचं सांगितल जात आहे.

Web Title: Is This is the first watch in the world invented by Peter Henlein?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.