बाबो! महिलेचे अश्रू पिण्यासाठी डोळ्यात घुसल्या मधमाश्या, डॉक्टरही झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:07 PM2019-04-09T15:07:38+5:302019-04-09T15:11:41+5:30

मधमाश्या या किती घातक असतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मग विचार करा की, एका तरुणीच्या डोळ्यात चक्क चार मधमाश्या गेल्या.

Doctors find live four bees inside woman's eye where they were drinking her tears | बाबो! महिलेचे अश्रू पिण्यासाठी डोळ्यात घुसल्या मधमाश्या, डॉक्टरही झाले हैराण!

बाबो! महिलेचे अश्रू पिण्यासाठी डोळ्यात घुसल्या मधमाश्या, डॉक्टरही झाले हैराण!

googlenewsNext

(Image Credit : dailymail.co.uk)

मधमाश्या या किती घातक असतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मग विचार करा की, एका तरुणीच्या डोळ्यात चक्क चार मधमाश्या गेल्या. डोळ्यात खाज आणि सूज येत असल्याकारणाने ती रुग्णालयात गेली होती. या २० वर्षीय तरूणीचं नाव एमएस ही असं आहे.

जेव्हा डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी पाहिलं होतं तिच्या डोळ्यात चार जिवंत मधमाश्या आहेत. या मधमाश्या महिलेच्या डोळ्याच्या सॉकेटमध्ये होत्या आणि यामुळे तिच्या डोळ्यात लागोपाठ अश्रू येत होते. 

महिलेवर तायवानच्या फॉयिन यूनिव्हर्सिटी रुग्णालयात उपचार केले गेले. महिलेने डॉक्टरांना सांगितले की, साफसफाई करत असताना अचनाक तिच्या डोळ्यात किडे गेले होते. डोळ्यांशी संबंधित समस्यांवर उपचार करणारे डॉक्टर हुंग-ची-थिंग म्हणाले की, अशाप्रकारची ही पहिलीच मेडिकल केस आहे. ज्यात डोळ्यांच्या आत जिवंत किडे आढळले. 

ची-थिंग म्हणाले की, डोळ्यांची तपासणी करत असताना किड्यांच्या पायासारखी काही निशाण आधी दिसले नव्हते. मी मायक्रोस्कोपच्या मदतीने हे किडे कोणताही त्रास न होऊ देता एक-एक करून बाहेर काढले. चार मधमाश्या बाहेर काढल्या.

एमएसने याबाबत सांगितले की, काम करत असताना अचानक हवेची झुळूक आली आणि डोळ्यात काहीतरी गेलं. आधी वाटलं की, धुळ-माती असावी. पण नंतर अचानक डोळ्यांमध्ये वेदना होऊ लागली होती. त्यानंतर डोळ्यातून सतत अश्रू येऊ लागले होते आणि सूजही आली होती. 

पाण्याने डोळे धुतल्यावरही वेदना कमी होत नव्हत्या. डॉक्टरांनी सांगितले की, डोळ्यांवर स्वीट बी ने हल्ला केला होता. या प्रजातीच्या मधमाश्या घामाकडे आकर्षित होतात. एमएसवप उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या डोळ्यातून या मधमाश्या जिवंत काढण्यात आल्या. या मधमाश्या डोळ्यातील मिठाकडे आकर्षित होऊन मनुष्याच्या डोळ्यात जातात. 

Web Title: Doctors find live four bees inside woman's eye where they were drinking her tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.