पाणीवाला बाबाच्या दर्शनासाठी गर्दी

By Admin | Published: December 16, 2014 03:31 AM2014-12-16T03:31:20+5:302014-12-16T03:31:20+5:30

केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बाबाचा दरबार सोमवारी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मसाला मार्केटमध्ये भरला होता.

The crowd for dawn dawn | पाणीवाला बाबाच्या दर्शनासाठी गर्दी

पाणीवाला बाबाच्या दर्शनासाठी गर्दी

googlenewsNext

नवी मुंबई : केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बाबाचा दरबार सोमवारी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मसाला मार्केटमध्ये भरला होता. विशेष म्हणजे, यासाठी पोलीस आणि एपीएमसी प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
केवळ तीन वेळा पाणी पाजून मधुमेह, पक्षघात, थायरॉईडसारखे आजार बरा करण्याचा दावा श्री राधेकृष्णाजी महाराज ऊर्फ पानीवाले बाबाने केला आहे.मध्यवर्ती सुविधागृह इमारतीजवळ ‘रोगमुक्त हो सभी, बाबा का संकल्प यही’चा नारा देत हे नि:शुल्क शिबिर पार पडले.
पाणीवाला बाबाच्या कार्यक्रमासाठी एपीएमसी प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही हे शिबीर झाले. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून विनापरवाना कार्यक्रम आयोजीत केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद रोमण यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The crowd for dawn dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.