जोडप्याच्या फोटोने टाकले लोकांना संभ्रमात

By admin | Published: April 29, 2017 07:10 AM2017-04-29T07:10:02+5:302017-04-29T07:10:02+5:30

समाजमाध्यमांवर सध्या एका जोडप्याचा फोटा व्हायरल झाला आहे. अँडी फ्युटेस नावाच्या व्यक्तीने टिष्ट्वटरवर बुधवारी फोटो अपलोड केला होता.

Confused by the couple's photos | जोडप्याच्या फोटोने टाकले लोकांना संभ्रमात

जोडप्याच्या फोटोने टाकले लोकांना संभ्रमात

Next

समाजमाध्यमांवर सध्या एका जोडप्याचा फोटा व्हायरल झाला आहे. अँडी फ्युटेस नावाच्या व्यक्तीने टिष्ट्वटरवर बुधवारी फोटो अपलोड केला होता. युझर्सना त्यात असे काही दिसले की तो व्हायरल झाला. अँडीने फोटोखाली लिहिले होते की, ‘आय लव्ह माय गर्लफ्रेंड इव्हन ईफ शी ईज ए जेमिनी.’ फोटो बघितला की फोटो सुंदर जोडप्याचा दिसत होता; परंतु फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर वेगळेच काही दिसत होते. या जोडप्याच्या मागे आरसा लावलेला आहे. त्यात दोघांचे प्रतिबिंब दिसते; परंतु या आरशात मुलीचा चेहरा दिसतो आहे. या फोटोने लोकांना संभ्रमात पाडले. या फोटोवर लोकांनी अनेक प्रकारची मते व्यक्त केली. एकाने लिहिले की, हा फोटो खूपच भीतिदायक व धक्कादायक आहे. दुसऱ्या एकाने फोटोला झूम करून त्याचा स्क्रीन शॉट पोस्ट करून लिहिले की ‘हे आहे तरी काय?’

Web Title: Confused by the couple's photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.