एका ‘जास्त दिवसा’ची गंंमत! आज २९ फेब्रुवारी, महत्त्व काय, कोणत्या देशात काय समज-गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:20 AM2024-02-29T09:20:12+5:302024-02-29T09:21:18+5:30

लिपलिंग्ज म्हणजे २९ फेब्रुवारी या लिप दिवसाला ज्यांचा जन्म झालेला असतो अशा व्यक्ती. दर चार वर्षांतून एकदा आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांची संख्या जगात ५०  लाखांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे.

A 'more day' of fun! Today 29 February, what is important, what is joy in Contries | एका ‘जास्त दिवसा’ची गंंमत! आज २९ फेब्रुवारी, महत्त्व काय, कोणत्या देशात काय समज-गैरसमज...

एका ‘जास्त दिवसा’ची गंंमत! आज २९ फेब्रुवारी, महत्त्व काय, कोणत्या देशात काय समज-गैरसमज...

आज २९ फेब्रुवारी. २०२४ या वर्षातला एक जास्तीचा दिवस. या दिवसाचं महत्त्व काय, या दिवसाचा आनंद काय, हे सगळ्यात जास्त लिपलिंग्जच सांगू शकतील. 

लिपलिंग्ज म्हणजे २९ फेब्रुवारी या लिप दिवसाला ज्यांचा जन्म झालेला असतो अशा व्यक्ती. दर चार वर्षांतून एकदा आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांची संख्या जगात ५०  लाखांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. जगभरात लिप इयर, लिप दिवसाला धरून अनेक समज आणि प्रथा आहेत. सोबतच अंधश्रद्धा देखील आहेत.

* आयर्लण्डमध्ये २९ फेब्रुवारी हा दिवस ‘बॅचलर डे’ म्हणून ओळखला जातो. ‘लेडीज प्रिव्हिलेज’ अशीही या दिवसाची या देशात ओळख आहे. आपल्याला आवडतो तो पुरुष कधीतरी येऊन आपल्याला मागणी घालेल, याची वाट बघत न बसता तरुण मुली / स्त्रिया स्वत: त्या पुरुषाला मागणी घालतात. अर्थात त्याने हो असंच उत्तर द्यायचं असतं. पण, आता अनेकजण म्हणतात की, त्याने ‘नाही’ म्हटलं तरी चालेल. पण त्याने एक आकर्षक भेटवस्तू मागणी घालणाऱ्या स्त्रीला द्यायला हवी.

* २००४ मध्ये आयरिश सरकारने आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्षाचा दहावा वर्धापन दिन म्हणून २९ तारखेला जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला १०० यूरो भेट म्हणून दिले होते.

* ग्रीक प्रथेनुसार लिप वर्षात विशेषत: २९ फेब्रुवारीला लग्न केलं तर ते लग्न अशुभ मानलं जातं. या लग्नाची परिणीती घटस्फोटात होते, असा येथे समज आहे.

* स्काॅटलंडमध्ये २९ फेब्रुवारीला ज्यांचा जन्म होतो त्यांचं आयुष्य कष्टप्राय असतं, असं मानलं जातं. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही लिप वर्ष हे तोट्याचं किंवा वाईट मानलं जातं. हा अधिकचा दिवस असलेल्या वर्षात अशुभ घटना घडतात, असाही समज आहेच.

* फ्रान्समध्ये २९ फेब्रुवारीला एक विशेष वृत्तपत्र प्रसिद्ध केलं जातं.  दर चार वर्षांनी फक्त एकच दिवस हे प्रसिद्ध होतं. १९८० पासून ‘सॅपेर्स कॅन्डल’ नावाचं हे विशेष वर्तमानपत्र आजच्या दिवशी प्रसिद्ध करण्याची प्रथा सुरू झाली. हे वृत्तपत्र फ्रान्सबरोबरच लक्ज़ेमबर्ग आणि बेल्जियम येथेही उपलब्ध असतं. आजच्या दिवशी या विशेष वर्तमानपत्राची हातोहात विक्री होते.

- सुवर्णा महाजन 
अमरावती

समकालीन महत्त्वाचे मुद्दे मांडणारी, नवी चर्चा सुरू करणारी 
वाचक-पत्रे या स्तंभामध्ये प्रसिद्ध केली जातील. आपली पत्रे 
येथे पाठवा : janman@lokmat.com

Web Title: A 'more day' of fun! Today 29 February, what is important, what is joy in Contries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.