रावेरजवळ पवन एक्स्प्रेसमधून पडून युवक ठार दुसरा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 07:12 PM2018-04-18T19:12:34+5:302018-04-18T19:12:34+5:30

जागेच्या वादातून झालेल्या भांडणात बळी गेल्याचा संशय

Youth killed and seriously injured in Pawan Express near Rawar | रावेरजवळ पवन एक्स्प्रेसमधून पडून युवक ठार दुसरा गंभीर जखमी

रावेरजवळ पवन एक्स्प्रेसमधून पडून युवक ठार दुसरा गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देजागेच्या वादातून युवकाचा बळी गेल्याचा संशयरावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे झाली घटनामुंबई-जबलपूर एक्सप्रेसच्या चालकाच्या लक्षात आली घटना

आॅनलाईन लोकमत
भुसावळ/रावेर,दि.१८ : दरभंगा पवन एक्स्प्रेसमधून पडून बिहारा राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मनीषकुमार यादव (वय २२) हा युवक पडून जागीच ठार झाला. त्याच्या सोबतचा मित्र नरेशकुमार यादव (वय १५) हा गंभीर जखमी झाला. ही दुर्घना मंगळवारी रात्री रावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे डाऊन रेल्वे मार्गावर खंब्बा क्रमांक ४७९ /१४ ते १६ च्या दरम्यान घडली. जागेच्या वादातून झालेल्या भांडणात या तरुण प्रवाशाचा बळी गेल्याचा संशय आहे.
मुंबईत नोकरी व्यवसायानिमीत्त आलेल्या बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील दोन युवक सुट्टीनिमित्त गावी लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्स्प्रेस डाऊन ११०६१ ने परत जात असतांना मंगळवारी रात्री रावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे डाऊन रेल्वे मार्गावरील खंब्बा क्रमांक ४७९ /१४ ते १६ च्या दरम्यान धावत्या गाडीतून खाली पडल्याने मनिषकुमार यादव (वय २२) हा जागीच ठार झाला. त्याचा मित्र नरेशकुमार यादव हा डावा पाय फ्रॅक्चर होवून गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जागेच्या वादातून झालेल्या भांडणात ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
डाऊन मार्गावरून रात्री १० वाजेच्या सुमारास गेलेल्या डाऊन १२१८८ मुंबई - जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी रावेर स्थानक व्यवस्थापकांना अपघाताची ही खबर दिली.

Web Title: Youth killed and seriously injured in Pawan Express near Rawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.