जळगावात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:25 AM2019-02-14T11:25:13+5:302019-02-14T11:25:28+5:30

धनराजने लिहिली आठ पानांची चिठ्ठी

Youth commits suicide in Jalgaon | जळगावात तरुणाची आत्महत्या

जळगावात तरुणाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देलग्नामुळे नैराश्य आल्याची चर्चा


जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात लिपिक असलेल्या धनराज कांतीलाल वाघ (वय ३३) या तरुणाने मंगळवारी रात्री रामेश्वर कॉलनीत गळफाव लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी त्याच भागात पुन्हा संजय सुरेश हयालिंगे (वय २४, रा.गजानन रेसीडेन्सी) या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा दुपारी घरातील बेडरुमध्ये एकटाच होता. बराच वेळा झाला तरी तो बाहेर का येत नाही,म्हणून आई सुमन बघायला गेली असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. अन्य मुले व शेजारींच्या मदतीने त्याला उतरवून जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सायंकाळी साडे पाच वाजता हा प्रकार उघड झाला असला तरी प्रत्यक्षात संजय याने दुपारीच आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
लग्नामुळे नैराश्य आल्याची चर्चा
संजय हे चार भाऊ आहेत. दोन मोठ्या भावांचे लग्न झालेले आहे, मात्र संजयचे लग्न जुळत नव्हते, त्यामुळे तो नैराश्यात होता, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे अशी शक्यता रामेश्वर कॉलनीत वर्तविली जात होती. संजयचे वडील रेल्वे सुरक्षा बलात नोकरीला होते. सर्व भाऊ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.
एकाची अंत्ययात्रा दुसºयाचा गळफास
याच भागातील धनराज वाघ याच्यावर दुपारी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना त्याच वेळेत संजयने घरात गळफास घेतल्याचे बोलले जात होते.
धनराजने लिहिली आठ पानांची चिठ्ठी
धनराज वाघ याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली, तत्पूर्वी त्याने आठ पानांची चिठ्ठी लिहिली असून त्यात दोन पोलीस व त्याच्या वडीलांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली. धनराजचे नातेवाईक या लोकांविरुध्द तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिसात गेले होते. मात्र तेथून ते लगेच परत आले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सायंकाळी तक्रार द्यायला नातेवाईक येणार होते, मात्र उशिरापर्यंत कोणीच आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Youth commits suicide in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.